महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नेपोलीने जिंकला इटालियन चषक, रोनाल्डोच्या जुव्हेंटसला हरवले

नेपोलीने तब्बल सहा वर्षानंतर या चषकावर नाव कोरले. या विजयामुळे नेपोलीलाही युरोपा लीगच्या गटात थेट प्रवेश मिळाला आहे. प्रेक्षकांशिवाय खेळल्या गेलेल्या सामन्यात दोघांपैकी एकाही संघाला गोल करता आला नाही. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला रोनाल्डोला गोल करण्याची संधी मिळाली होती. पण नेपोलीच्या गोलरक्षक अ‍ॅलेक्स मेररेटने त्याचा प्रयत्न मोडीत काढला.

By

Published : Jun 19, 2020, 3:39 PM IST

Napoli won its sixth coppa italia trophy after beating juventus fc
नेपोलीने जिंकला इटालियन चषक, रोनाल्डोच्या जुव्हेंटसला हरवले

नवी दिल्ली -दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला सामन्याच्या पाचव्या मिनिटाला गोल करण्यात अपयश आल्याने जुव्हेंटसला नेपोलीविरूद्ध पराभव पत्करावा लागला. परिणामी, पेनल्टी शूटआऊटमध्ये नेपोलीने जुव्हेंटसला 4-2 ने पराभूत केले आणि सहाव्यांदा इटालियन चषकावर आपले नाव कोरले.

नेपोलीने तब्बल सहा वर्षानंतर या चषकावर नाव कोरले. या विजयामुळे नेपोलीलाही युरोपा लीगच्या गटात थेट प्रवेश मिळाला आहे. प्रेक्षकांशिवाय खेळल्या गेलेल्या सामन्यात दोघांपैकी एकाही संघाला गोल करता आला नाही. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला रोनाल्डोला गोल करण्याची संधी मिळाली होती. पण नेपोलीच्या गोलरक्षक अ‍ॅलेक्स मेररेटने त्याचा प्रयत्न मोडीत काढला.

रोनाल्डोच्या आधीच आर्केडियाज मिलिकने नेपोलीसाठी निर्णायक गोल केला. रोनाल्डोला अंतिम पेनल्टी घ्यायची होती, पण पाउलो डायबालाचा फटका गोलकीपरने रोखला, तर डॅनिलोचा फटका क्रॉसबारवर गेला. या पराभवामुळे रोनाल्डो अश्रू रोखू शकला नाही. त्याचा साथीदार जुआन कॉड्राडो म्हणाला, "निकालामुळे त्याला थोडे वाईट वाटले. जेव्हा सामना पेनल्टीमध्ये जातो तेव्हा तो लॉटरीसारखा होतो.''

जुवेंटसचे प्रशिक्षक मॉरिजियो सारी म्हणाले, ''कोरोनामुळे तीन महिने मैदानाबाहेर राहिल्यानंतर रोनाल्डोला त्याचा वेग परत मिळवण्यासाठी धडपड करावी लागली. जेव्हा आपण सामने खेळत नाही तेव्हा ही सामान्य गोष्ट असते."

ABOUT THE AUTHOR

...view details