महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

लिव्हरपूलने चाहत्यांना दिल्या वैशाखीनिमित्त शुभेच्छा

"आमच्या सर्व शीख समर्थकांना जे खालसा दिन साजरा करीत आहेत त्यांना वैशाखी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा", असे लिव्हपरपूलने म्हटले आहे.

Liverpool greets fans on Vaisakhi
लिव्हरपूलने चाहत्यांना दिल्या वैशाखीनिमित्त शुभेच्छा

By

Published : Apr 13, 2020, 5:20 PM IST

लंडन -इंग्लिश फुटबॉल क्लब लिव्हरपूलने सोमवारी त्यांच्या सर्व शीख समर्थकांना वैशाखीदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्व फुटबॉल लीग स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 2019-20 हंगाम तेव्हाच सुरू होईल जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आली असेल, असे प्रीमियर लीगने जाहीर केले होते.

"आमच्या सर्व शीख समर्थकांना जे खालसा दिन साजरा करीत आहेत त्यांना वैशाखी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा", असे लिव्हपरपूलने म्हटले आहे.

वैशाखी किंवा बैसाखी भारतातील पंजाब येथील साजरा होणारा एक सण आहे. हा सण शेतात कापणी करण्यावेळी साजरा केला जाते. हा सण 13 किंवा 14 एप्रिलला साजरा केला जातो. वैशाखी हा शीख आणि हिंदू संप्रदायाचा ऐतिहासिक आणि धार्मिक सण आहे. या दिवशी शीख संप्रदायाचे नवीन वर्षही सुरु होते. इ.स. 1699 मध्ये गुरु गोविंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या खालसा पंथाचा हा स्थापना दिवस म्हणूनही ओळखला जातो. हिंदू धर्मात तसेच शीख धर्मात वसंत ऋतूतील कापणीच्या हंगामाचा दिवस म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहे. हिंदूंमध्ये वैशाखीला सौर कालगणनेनुसार नव्या वर्षाचा पहिला दिवस मानला जातो.

ABOUT THE AUTHOR

...view details