नवी दिल्ली -जेरार्ड पिके, गोलरक्षक मार्क आंद्रे टेर स्टेगेन, मिडफिल्डर फ्रँकी डी जोंग आणि डिफेन्डर क्लेमेंट लेंगेल्ट यांच्या करारात बार्सिलोना फुटबॉल क्लबने वाढ केली आहे. कित्येक आठवड्यांच्या वाटाघाटीनंतर कराराच्या विस्ताराच्या अटींवर सहमती दर्शवली गेली.
बार्सिलोनाकडून चार खेळाडूंना करारवाढ
३३ वर्षीय पिकेचा करार जून २०२४पर्यंत वाढवण्यात आला आहे. पिके पुढील सत्रात काही विशिष्ट सामने खेळेल, या अटीवर हा करार केला असल्याचे क्लबने सांगितले आहे.
बार्सिलोनाकडून चार खेळाडूंना करारवाढ
३३ वर्षीय पिकेचा करार जून २०२४पर्यंत वाढवण्यात आला आहे. पिके पुढील सत्रात काही विशिष्ट सामने खेळेल, या अटीवर हा करार केला असल्याचे क्लबने सांगितले आहे. मात्र, या सामन्यांच्या संख्येबाबत खुलासा होऊ शकलेला नाही.
युरोपच्या अव्वल क्लब स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बायर्न म्युनिकने बार्सिलोनाला २-० असे पराभूत केले होते.