नवी दिल्ली - इंग्लिश प्रीमियर लीग क्लब अर्सेनल कोरोना संकटातही सराव सुरू करणार आहे. सध्या लीगमधील नवव्या क्रमांकावर असलेल्या अर्सेनलने जाहीर केले, की ते त्यांच्या खेळाडूंना प्रशिक्षणात परत येऊ देतील, परंतु त्यांनी सरकारच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले पाहिजे.
कोरोना संकटातही दिग्गज फुटबॉल संघ सुरू करणार सराव
अर्सेनलला पाहून इतर संघदेखील लवकरच मैदानात परत येऊ शकतात. जर्मनीमध्ये बुंडेस्लिगाने सामने पुन्हा सुरू होण्यासाठी संभाव्य तारीख निश्चित केली आहे.
“पुढील आठवड्यात आमच्या लंडन कॉलनी प्रशिक्षण मैदानावर खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल. प्रवेश मर्यादित राहील, त्याचे काळजीपूर्वक व्यवस्थापन केले जाईल आणि सोशल डिस्टन्सिंग कायम राखले जाईल. खेळाडू एकटे प्रवास करतील, ते वैयक्तिकरित्या प्रशिक्षित होतील आणि घरी परततील,” असे अर्सेनालच्या एका प्रवक्त्याने सांगितले आहे.
अर्सेनलला पाहून इतर संघदेखील लवकरच मैदानात परत येऊ शकतात. जर्मनीमध्ये बुंडेस्लिगाने सामने पुन्हा सुरू होण्यासाठी संभाव्य तारीख निश्चित केली आहे.