महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार ब्राझीलच्या सेरी-एचा हंगाम

सेरी-ए स्पर्धा मेमध्ये पुन्हा सुरू होणार होती परंतु कोरोनाव्हायरसमुळे ती पुढे ढकलण्यात आली. फिफाची आंतरराष्ट्रीय विंडो 3 ते 8 सप्टेंबर, 8 ते 13 ऑक्टोबर, 12 ते 17 नोव्हेंबरपर्यंत बंद असेल. आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे बर्‍याच लीग या ब्रेकमध्ये थांबवल्या जातात. मात्र, कोरोनाव्हायरसमुळे हे कठीण झाले असल्याचे, सीबीएफचे अध्यक्ष रोजेरिओ कॅबोक्लो म्हणाले आहेत.

By

Published : Jul 10, 2020, 4:38 PM IST

Brazil serie a football season will run till february
फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार ब्राझीलच्या सेरी-एचा हंगाम

रिओ दि जानेरो - फिफाने अंमलात आणलेल्या आंतरराष्ट्रीय ब्रेकमध्ये ब्राझिलियन फुटबॉल लीग सेरी-ए सुरू राहणार आहे. लीगच्या 2020च्या वेळापत्रकाद्वारे ही माहिती मिळाली. एका वृत्तसंस्थेनुसार, ब्राझीलच्या फुटबॉल फेडरेशने (सीबीएफ) एका निवेदनात म्हटले आहे, की हंगाम 9 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 24 फेब्रुवारी 2021 रोजी संपेल. क्लब आठवड्यातून दोनदा खेळतील. यात ख्रिसमस आणि न्यू-ईयरचा कालावधीही असेल.

सेरी-ए स्पर्धा मेमध्ये पुन्हा सुरू होणार होती परंतु कोरोनाव्हायरसमुळे ती पुढे ढकलण्यात आली. फिफाची आंतरराष्ट्रीय विंडो 3 ते 8 सप्टेंबर, 8 ते 13 ऑक्टोबर, 12 ते 17 नोव्हेंबरपर्यंत बंद असेल. आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे बर्‍याच लीग या ब्रेकमध्ये थांबवल्या जातात. मात्र, कोरोनाव्हायरसमुळे हे कठीण झाले असल्याचे, सीबीएफचे अध्यक्ष रोजेरिओ कॅबोक्लो म्हणाले आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. तब्बल 180पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात तब्बल 2 लाख 23 हजार 449 कोरोना रुग्ण आढळले असून 5 हजार 417 जणांचा मृत्यू झाला आहे.

जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असताना, अमेरिका, भारत, डेन्मार्क, इटली या देशांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरgवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्याने नागरिकांचा रस्त्यावरील वावर वाढला तर कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details