नवी दिल्ली -कोरोना आजाराशी लढण्यासाठी अनेक संस्थानी पुढाकार घेतला आहे. क्रीडाविश्वातून अनेक मंडळे या लढाईत योगदान देत आहेत. प्रसिद्ध फुटबॉल क्लब अर्सेनालनेही या लढाईत मदत करण्याचे ठरवले आहे.
कोरोना युद्ध : अर्सेनालकडून मोठी मदत जाहीर
इंग्लंडचा फुटबॉल क्लब अर्सेनलने शुक्रवारी जाहीर केले की, स्थानिक समुदायातील गरजू लोकांना या भयंकर आजाराविरुद्ध लढण्यासाठी तीस हजारांहून अधिकांना मोफत जेवण तसेच वैयक्तिक स्वच्छता उत्पादने दिली जातील. शिवाय, क्लबकडून स्थानिक संस्थांना १ लाख पौंड आणि ५० हजार पौंड कोरोना संकट निधीसाठी दिले जाणार आहेत.
कोरोना युद्ध : अर्सेनालकडून मोठी मदत जाहीर
इंग्लंडचा फुटबॉल क्लब अर्सेनलने शुक्रवारी जाहीर केले, की स्थानिक समुदायातील गरजू लोकांना या भयंकर आजाराविरुद्ध लढण्यासाठी तीस हजारांहून अधिकांना मोफत जेवण तसेच वैयक्तिक स्वच्छता उत्पादने दिली जातील. शिवाय, क्लबकडून स्थानिक संस्थांना १ लाख पौंड आणि ५० हजार पौंड कोरोना संकट निधीसाठी दिले जाणार आहेत.
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरस लागण झालेल्यांची संख्या ६५ हजारांच्या पुढे गेली आहे आणि मृतांचा आकडा सात हजारांपेक्षा जास्त झाला आहे.