कोलकाता - अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) दिग्गज फुटबॉलपटू आयएम विजयन यांची पद्मश्री पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वरिष्ठ अधिका्याने याबाबत माहिती दिली.
51 वर्षीय विजयन यांना 2003 मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. तीन वेळा 'एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर' असलेले विजयन हे देशातील देशातील सर्वात कुशल फुटबॉलपटूंपैकी एक मानले जातात.
विजयन यांनी 1992 ते 2003 दरम्यान भारतासाठी 79 सामने खेळले असून 40 गोल नोंदवले आहेत. 1999 मध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चषक जिंकणार्या भारतीय संघाचा ते भाग होते. त्यांनी त्या स्पर्धेत भूतानविरुद्ध 12 व्या सेकंदात गोल नोंदवला होता. जो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान आंतरराष्ट्रीय गोल आहे.
2003 च्या एफ्रो एशियन गेम्समध्ये विजयन यांनी चार गोल करून अव्वल स्थान पटकावले होते. 2003 मध्येच त्यांनी फुटबॉलमधून निवृत्ती घेतली.