मुंबई -आयपीएलच्या हंगामागातील नववा सामना आज डॉ. डी वाय पाटील स्टेडियम येथील पार पडणार आहे. मुंबई इडिंयन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात ही लढत पार पडणार ( Mumbai Indians Vs Rajsthan Royals ) आहे. मुंबईने टॉस जिंकला आहे. त्यांनी पहिल्यांदा क्षेत्रररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वाधिक पाच वेळा आयपीएल विजेच्या असणाऱ्या मुंबई डंडियन्सला पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून हार पत्करावी लागली होती. त्यानंतर आता मुंबईसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे. मात्र, आजच्या लढतीत प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव याचे पुनरागन होण्याची सर्वांना अपेक्षा होती. त्यावर आज पाणी फिरले आहे. तर, राजस्थान रॉयल्सने सलमीच्या लढचीच सनराझर्स हैदराबादला हरवत विजयाची बोहणी केली होती. कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वाकाली राजस्थान रॉयल्स संघ यंदा चांगला समतोल साधत असल्याते मत जानकरांनी मांडले आहे.
टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक चांगली खेळपट्टी आहे. दर या खेळपट्टीवर असणार नाही. आमच्या चुका सुधारण्यासाठी प्रत्येक सामना आम्हाल सुधारण्याची संधी देतो. प्रत्येक सामन्यातून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करत आहे.