महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 24, 2022, 10:49 AM IST

ETV Bharat / sports

INDvSA ODI Series : राहुलने नेतृत्वाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली, अजून शिकेल आणि प्रगती करेल: राहुल द्रविड

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात वनडे (India v South Africa ODI series) मालिका पार पडली आहे. त्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने केएल राहुलला पाठिंबा दर्शवत केएल राहुलने नेतृत्वाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली.

Rahul Dravid
Rahul Dravid

केपटाऊन: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India v South Africa) त्यानंतर आता वनडे मालिका देखील 3-0 अशा फरकाने खिश्यात घातली आहे. यावर आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रतिक्रिया (Reaction by coach Rahul Dravid) दिली आहे. त्यांनी मान्य केले की, त्यांच्या संघाने महत्वाच्या वेळी स्मार्ट क्रिकेट खेळले नाही. त्याचबरोबर येणाऱ्या काळाबाबत एक कर्णधार म्हणून त्यांनी पुढे केएल राहुल चांगली कामगिरी करेल असे म्हणत राहुलला पाठिंबा दर्शवला.

राहुल द्रविड यांना विचारण्यात आले की, त्यांना कर्णधार म्हणून केएल राहुल (KL Rahul as captain) कसा वाटला. कारण कर्णधार म्हणून केएल राहुलने चार ही सामने गमावले आहेत. त्यावर उत्तर देताना द्रविड म्हणाले, त्याने चांगली भूमिका पार पाडली. परंतु निकाल अपेक्षित असे हाती आले नाही. तो आता तर सुरुवात करत आहे आणि मला वाटते त्याने चांगले काम केले. तो सातत्याने प्रगती करत जाईल.

भारत हारल्यानंतर राहुल द्रविड म्हणाले, ही मालिका एक डोळे उघडणारी आहे. परंतु 2023च्या वनडे विश्वचषकाच्या (2023 ODI World Cup) अगोदर भरपूर वेळ आहे. त्यामुळे भारतीय संघाला लवकरच सुधारणा कराव्या लागतील. कारण ही एक चांगली गोष्ट आहे की ज्यामुळे डोळे उघडतील. आम्ही जास्त वनडे सामने खेळले नाहीत. आम्ही मागील वर्षी मार्च महिण्यात इंग्लंड विरुद्ध शेवटची वनडे मालिका खेळली होती. द्रविड म्हणाले , 6, 7 आणि 8 क्रमांकाचे खेळाडू संघ निवडीच्या वेळेस उपलब्ध नव्हते. त्यामुळे जेव्हा हे खेळाडू पुन्हा संघात येतील, तेव्हा संघ संतुलित होईल. त्याचबरोबर त्यांनी मान्य केले की, दोन्ही सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 30 षटकांपर्यंत सामन्यात होता. त्यानंतर काही खेळाडूंनी खराब शॉट खेळले. त्यामुळे द्रविड म्हणाले की, आम्ही महत्वाच्या वेळेस स्मार्ट क्रिकेट खेळले नाही.

हेही वाचा:SAvsInd 3rd Odi: दीपक चहरला अधिक संधी देण्याचा विचार आहे, त्याच्यामध्ये फलंदाजी करण्याची क्षमता आहे: राहुल द्रविड

ABOUT THE AUTHOR

...view details