मुंबई:भारतीय महिला संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी लॉर्ड्सच्या ( Jhulan play her last Odi on Lords ) मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणू शकते. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाची अनुभवी आणि वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आता क्रिकेट जगतातून निवृत्ती घेण्याची निर्णय घेतला ( Jhulan Goswami retire from international cricket ) आहे.
झुलन गोस्वामीने अलीकडेच इंग्लंड दौऱ्यासाठी महिला वनडे संघात पुनरागमन केले. मिळालेल्या माहितीनुसार, ती 24 सप्टेंबरला इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. झुलनने सर्व फॉरमॅटमध्ये 352 विकेट ( Jhulan took 352 wickets in all formats )घेतल्या आहेत. गोस्वामी वनडेत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. तिने आतापर्यंत 201 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 252 विकेट्स घेतल्या आहेत.