महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

केकेआरच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण; कोलकाता-बंगळुरूचा सामना रद्द

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूदरम्यान ३० वा सामना खेळवला जाणार होता. मात्र, अचानक हा सामना रद्द करण्यात आला आहे.

Banglore-Kolkata IPL match latest news
केकेआर आणि आरसीबी आयपीएल सामना रद्द

By

Published : May 3, 2021, 1:00 PM IST

अहमदाबाद - इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)चा १२ वा हंगाम सुरू आहे. आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूदरम्यान ३० वा सामना खेळवला जाणार होता. मात्र, अचानक हा सामना रद्द करण्यात आला आहे. कोलकात्याच्या संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा समाना रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. रद्द झालेला सामना नंतर खेळवला जाणार आहे.

कोलकात्याच्या संघातील वरूण चक्रवर्ती आणि संदीप वारियर हे दोन खेळाडू कोरोनाबाधित झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अशा परिस्थितीमध्ये सामना खेळण्यास उत्सुक नाही. त्यामुळे हा सामना रद्द करून नंतर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय)एका अधिकाऱ्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details