मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या पर्वामध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरूने सलग तीन सामन्यांत तीन विजय मिळवत बहारदार अशी कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सची वाटचाल कासव गतीने सुरू आहे.
बंगळुरू-राजस्थान हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघाता आतापर्यंत २३ सामने झाली आहेत. यात दोन्ही संघानी प्रत्येकी १०-१० सामन्यात विजय मिळवला आहे. राहिलेल्या तीन सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.
बंगळुरू आणि राजस्थान यांच्यातील मागील ६ सामन्याची आकडेवारी पहिल्यास यात एक सामन्याचा निकाल लागलेला नाही. तर तीन सामन्यात राजस्थानचा संघ विजयी ठरला आहे. युएईमध्ये खेळवण्यात आलेल्या मागील हंगामातील उभय संघातील दोन्ही सामने बंगळुरू संघाने जिंकले आहेत.
विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरू संघाने आयपीएलच्या चौदाव्या हंगामात विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे. ते विजयी चौकार मारण्यासाठी उत्सुक आहेत. दुसरीकडे राजस्थानच्या संघाला सलामीच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर पराभव पत्कारावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात ते विजयी ठरले. तिसरा सामन्यात त्याचा पराभव झाला. आता ते विजयी लय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करतील. उभय संघातील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
हेही वाचा -IPL २०२१ : वाईड जाईल म्हणून चेंडू सोडला अन् केकेआरने सामना गमावला, पाहा व्हिडिओ
हेही वाचा -IPL २०२१ : धोनी, रोहितनंतर मॉर्गनकडून झाली चूक, बसला १२ लाख रुपयांचा फटका