चेन्नई - गतविजेता मुंबई इंडियन्स आणि गेल्या सत्रातील उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघ आज आमने सामने येणार आहेत. गेले दोन सामने मुंबई इंडियन्सने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जिंकले आहेत. तर दुसरीकडे दिल्लीचा संघाने पंजाबविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून आपण बहारात असल्याचे संकेत दिले आहेत.
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात केली आहे. मात्र, त्याला त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आलेले नाही. हीच स्थिती क्विंटन डी कॉकची देखील आहे. मुंबईच्या संघाकडे सूर्यकुमार यादव, इशान किशन, केरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्यासारखे खेळाडू आहेत, जे कोणत्याही क्षणी आक्रमक खेळी करू शकतात. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली असलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजी आक्रमणाने गेल्या काही सामन्यात चमक दाखवली आहे. बुमराहला ट्रेंट बोल्टची साथ आहे. पण अॅडम मिल्नेला आपली छाप सोडता आलेली नाही. फिरकीची मदार राहुल चहर आणि कृणाल पांड्यावर आहे.
दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाची जमेची बाजू म्हणजे शिखर धवन हा फॉर्ममध्ये असणे. त्याने आतापर्यंत स्पर्धेत १८६ धावा केल्या आहेत. धवन आणि पृथ्वी शॉ ही सलामी जोडी आक्रमक आहे. दिल्लीने मागील सामन्यात स्टिव्ह स्मिथला संधी दिली होती. पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कर्णधार ऋषभ पंतदेखील आपल्या आक्रमक खेळाने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या अडचणी वाढवू शकतो. दिल्लीकडे मार्कस स्टॉयनिस आणि ललित यादवसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्या जलदगती गोलंदाजीची धुरा ही कगिसो राबाडा आणि ख्रिस वोक्स यांच्यावर आहे. यासोबत एनरिक नॉर्टिजे रूपात संघाकडे आणखीन एक पर्याय उपलब्ध आहे. त्यांच्याकडे अनुभवी अमित मिश्रा, प्रवीण दुबे आणि अक्षर पटेलचा बदली आलेला शम्स मुल्लाणीसारखे पर्याय आहेत. ते अश्विनला मदत करू शकतात.
- मुंबई इंडियन्सचा संघ -
- रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, मोहसिन खान, हार्दिक पांड्या, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, ईशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्य तारे, एडम मिल्ने, नाथन कोल्टर नाइल, पीयूष चावला, जेम्स नीशाम, युद्धवीर चरक, मार्को जेनसन आणि अर्जुन तेंडुलकर.
- दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
- ऋषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वोक्स, आर अश्विन, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्ट्जे, इशांत शर्मा, आवेश खान, स्टीव स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णु विनोद, लुकमान मेरिवाला, शम्स मुल्लाणी, एम सिद्धार्थ, टॉम कुरेन, सॅम बिलिंग्स आणि अनिरूद्ध जोशी.
हेही वाचा -IPL २०२१ : आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वात विचित्र नेतृत्व, गंभीरने मॉर्गनला फटकारलं
हेही वाचा -RCB VS KKR : फलंदाजीदरम्यान मॅक्सवेल डिव्हिलियर्सवर रागावला; एबीने सांगितलं कारण