महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

युजवेंद्र आणि कुलदीपच्या जोडीला पुन्हा आणण्याची वेळ आली आहे - हरभजन सिंग

भारताला दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दोन्ही मालिकेत दारुन पराभव स्वीकारावा लागला. त्यावर बोलताना मंगळवारी माजी फिरकी गोलंदाज हरभजन (Former spin bowler Harbhajan Singh) म्हणाला फिरकी गोलदाजांची मालिकेत प्रभावी राहिली नाही. त्यामुळे आता कुलदीपच्या नावाचा विचार करण्याची गरज आहे.

HARBHAJAN SINGH
HARBHAJAN SINGH

By

Published : Jan 26, 2022, 11:51 AM IST

नवी दिल्ली: काही दिवसापूर्वी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India v South Africa) संघात कसोटी आणि वनडे सामन्यांची मालिका पार पडली आहे. यापैकी कसोटी मालिका दक्षिण आफ्रिका संघाने 2-1 अशा फरकांनी जिंकली होती. त्यानंतर वनडे मालिकेत ही दक्षिण आफ्रिका संघाने भारताला 3-0 ने अशा फरकाने क्लीन स्वीप दिला. या मालिकेत भारतीय फिरकीपटू आर. आश्विन आणि युजवेंद्र चहल यांच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेचे फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी, केशव महाराज आणि अंशकालिक एडेन मार्करम या तिघांनी जास्त विकेट्स घेतल्या.

आर. आश्विनने 2017 नंतर पुनरागमन करताना दोन वनडे सामन्यात फक्त 1 विकेट घेतली होती. त्याचबरोबर तिसऱ्या सामन्यात त्याच्या जागी जयंत यादवला संधी देण्यात आली होती. दुसरीकडे युजवेंद्र चहलने सुद्धा फक्त दोन विकेट्स घेतल्या होत्या. भारताच्या माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगला वाटते की, अश्विन आणि युझवेंद्र चहल या दोघांनीही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांविरुद्ध बचावात्मक भूमिका (India's bowling was defensive against Africa) घेतली आहे. त्यामुळे हरभजनचे म्हणने आहेकू, की चहल आणि कुलदीपला एकदिवसीय सामन्यांमध्ये पुन्हा आणण्याचा प्रयत्न करण्यात काही नुकसान नाही. जे 2019 च्या विश्वचषकापासून एकत्र खेळलेले नाहीत.

हरभजन सिंग इंडिया टुडे सोबत बोलताना म्हणाला (Harbhajan Singh told India Today) की, मला वाटते इंशात शर्मा आणि आर. आश्विनने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. मग ते कसोटी क्रिकेट असो किंवा वनडे. आर अश्विनबद्दल आदर बाळगून मला वाटते की तो एक चॅम्पियन गोलंदाज आहे. परंतु आता भारतीय संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये पर्याय शोधण्याची गरज आहे. जे यांच्यापेक्षा चांगली कामगिरी करु शकतील.

तो म्हणाला, कुलदीप यादव (Spinner Kuldeep Yadav) सारखा खेळाडू एक चांगला पर्याय असू शकतो. आपण 'कुलचा' संयोजनाकडे परत का जात नाही आणि ते टेबलवर काय आणू शकतात ते का पाहू नये? त्याने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत. त्याच्याकडे परत जाणे चांगली गोष्ट असेल.

तो पुढे म्हणाला, आर. आश्विन आणि चहल दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत खेळले आहेत. त्यांनी चेंडूने काही खास कामगिरी केली नाही. ते त्यांच्या दृष्टीकोनातून बचावात्मक होते. ते बऱ्याचदा एक स्लीप लावून विरोधी संघावंर आक्रमन करु शकत होते. परंतु असे आपल्याला बघायला मिळाले नाही. तसेच हरभजन सिंगने एक गोष्ट मान्य केली की, दक्षिण आफ्रिकेची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल नव्हती. परंतु त्याचे म्हणने आहे, की गोलंदाजांना मधल्या काही षटकांत विकेट घेण्यासाठी संधी निर्मान करण्याची गरज होती.

ABOUT THE AUTHOR

...view details