महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Controversy over cricket captaincy : कोहलीच्या प्रतिक्रियेवर बोलताना गावस्कर म्हणाले, BCCI प्रमुख गांगुलीला प्रश्न विचारायला हवा

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांचा विश्वास आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI ) सध्याचे अध्यक्ष हे दोन विधानांमधील विसंगती (चुकीची माहिती) दूर करू शकणारे आदर्श व्यक्ती आहेत.

By

Published : Dec 16, 2021, 3:53 PM IST

बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय कसोटी कर्णधार यांच्या विधानात तफावत
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय कसोटी कर्णधार यांच्या विधानात तफावत

दिल्ली- बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने ( Virat Kohli's press conference ) टी-20 कर्णधारपद काढून घेण्यासारख्या निर्णयावर बीसीसीआयने कोणताही संपर्क केला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली ( BCCI chief Sourav Gangul ) यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर मानतात की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष हे दोन विधानांमधील विसंगती (चुकीची माहिती) दूर करू शकणारे आदर्श व्यक्ती आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत कोहलीच्या वक्तव्याची दखल घेत महान फलंदाज गावस्कर म्हणाले की, गांगुलीला विचारले पाहिजे की बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय कसोटी कर्णधार यांच्या विधानात तफावत का आहे?, "मला वाटते की यामुळे (कोहलीची टिप्पणी) बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित करत नाही. त्यांना हे विचारले पाहिजे की कोहलीला असा संदेश दिला गेला असा समज कसा झाला.

नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने प्रत्येक कठीण प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर गावसकर यांनी हे वक्तव्य केले. "होय, ते (गांगुली) बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि निश्चितपणे त्यांना ही विसंगती का आहे हे विचारले पाहिजे. हा गोंधळ दूर करणारा कदाचित तो सर्वोत्तम व्यक्ती आहे," असे गावसकर म्हणाले.

कोहलीने टीम इंडियाच्या T20 कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर काही दिवसांनी, BCCI प्रमुख गांगुली यांनी खुलासा केला की बोर्डाने माजी कर्णधाराला सर्वात लहान फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती. तर, बुधवारी कसोटी कर्णधार कोहलीने दावा केला की बीसीसीआयने त्याला कधीही सर्वात लहान फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याबाबत पुनर्विचार करण्यास सांगितले नाही. दक्षिण आफ्रिका द्विपक्षीय मालिकेसाठी कसोटी संघ निवडण्याच्या ९० मिनिटांपूर्वी ५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये कर्णधारपदावरून आपली हकालपट्टी झाल्याचाही कोहलीने खुलासा केला.

हेही वाचा -Virat Kohli On Test Captainship : विराटने सोडले मौन; सांगितले कर्णधारपद जाण्याचे कारण !

ABOUT THE AUTHOR

...view details