नवी दिल्ली - भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिलाच विजय मिळवला. या सामन्यामध्ये धोनीने वापरलेल्या बलिदान चिन्हाच्या ग्लोव्हजचा वाद मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. त्यामुळे धोनीला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी #DhoniKeepTheGlove नावाचा ट्रेंड ट्विटरवर सुरू केला आहे.
CRICKET WORLDCUP : 'या' नियमांमुळे आयसीसीने घेतला धोनीवर आक्षेप
भारतीय सैन्याने धोनीला टेरिटोरियल आर्मीचे मानद लेफ्टनंट कर्नल हे पद दिले आहे.
धोनीचे सैन्यप्रेम हे जगजाहीर आहे. भारतीय सैन्याने धोनीला टेरिटोरियल आर्मीचे मानद लेफ्टनंट कर्नल हे पद दिले आहे. पण असे असले तरीही, आयसीसीने धोनीवर का आक्षेप घेतले हे पुढील नियमांच्या आधारे कळू शकेल.
आयसीसीचे कपडे व उपकरणांच्या वापराबाबतचे नियम-
यामध्ये असे म्हटले आहे की, "यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजवर उत्पादकाची दोन डिझाईन किंवा चिन्हे वापरण्यास परवानगी आहे. मात्र, जी मंजूर केलेली नाहीत ती चिन्हे वापरता येणार नाहीत.” आयसीसी फक्त राष्ट्रीय चिन्हे, व्यापारी चिन्हे, इव्हेंट चिन्हे, उत्पादकाची चिन्हे, खेळाडूच्या बॅटवरील चिन्हे, चॅरिटी किंवा अव्यापारी चिन्हे किटवर छापण्यास परवानगी देते. आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन झाले तर सामनाधिकाऱ्याला त्या खेळाडूला, जोपर्यंत उल्लंघन केलेली बाब सुधारत नाही तोपर्यंत मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार आहे.