महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फाफ डु प्लेसीसने द. आफ्रिकेच्या विश्वचषकातील पराभवाचे खापर फोडले आयपीएलवर..

आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीसने धक्कादायक खुलासा केला आहे. आफ्रिकेचा सर्वोत्तम गोलंदाज कगिसो रबाडाची मंदावलेली कामगिरी ही आयपीएलची देण असल्याचे  डु प्लेसीने स्पष्ट केले आहे.

विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर डु प्लेसीने केला धक्कादायक खुलासा, आयपीएलवर फोडले खापर

By

Published : Jun 24, 2019, 2:29 PM IST

Updated : Jun 24, 2019, 4:33 PM IST

लंडन -आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतून दक्षिण आफ्रिकेचा संघ बाहेर पडला आहे. पाकिस्तानने आफ्रिकेला ४९ धावांनी पराभूत केले. सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीवर आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीसने धक्कादायक खुलासा केला आहे. आफ्रिकेचा सर्वोत्तम गोलंदाज कगिसो रबाडाची मंदावलेली कामगिरी ही आयपीएलची देण असल्याचे डु प्लेसीसने स्पष्ट केले आहे.

डु प्लेसीस पुढे म्हणाला, ' रबाडा हा आमच्या संघातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. तो सातत्याने तीनही स्तरातून गोलंदाजी करतो आहे. त्याला विश्वचषकापूर्वी विश्रांतीची आवश्यकता होती. त्यामुळे आयपीएलमध्ये तो खेळू नये अशी आमची इच्छा होती. पण, तो आयपीएल खेळला. आणि त्याच्या संथ कामगिरीचा परिणाम विश्वचषकात दिसून आला. इम्रान ताहिरने उत्कृष्ट गोलंदाजी केली पण त्याला इतर गोलंदाजांची साथ लाभली नाही.'

रबाडा
या वर्ल्डकप स्पर्धेत आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व रबाडाकडे होते. मात्र तो अपयशी ठरला. त्याने ७ सामन्यात फक्त ६ बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये रबाडाने दिल्ली कॅपिटल्समधून खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्याने १२ सामन्यात २५ बळी घेतले होते. या वर्षात रबाडाने एकूण ३०३ षटके गोलंदाजी केली आहे. त्यापैकी, ४७ षटके आयपीएलमध्ये टाकली आहेत.
Last Updated : Jun 24, 2019, 4:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details