मुंबई- मी टीम इंडियात आलो तेव्हा माझा 'क्रश' युवराज सिंग होता, असे भारताचा मर्यादित षटकाचा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने सांगितले. युवराज भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू होता. त्याने भारताने जिंकलेल्या २००७ आणि २०११ च्या विश्वकरंडक विजयात मोलाची भूमिका निभावली होती.
रोहितने इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून युवराजशी गप्पा मारल्या. यात तो म्हणाला, 'माझी निवड भारतीय संघात झाली. तेव्हा मी पहिल्यांदा भारतीय खेळाडूंसोबत बसने प्रवास करणार होतो. बस लवकर सुटेल या भितीने मी ३० मिनिटाआधीच बसमध्ये जाऊन बसलो. तेव्हा युवराज हॉटेलच्या लॉबीमधून युवराज चश्मा घालून येताना दिसला. त्याने मला बसमध्ये आल्यावर विचारले, तु कोणाच्या सीटवर बसला आहेस हे माहित आहे का? मला काहीच महिती नव्हती त्याने मला दुसऱ्या सीटवर बसण्यास सांगितले. मला नंतर कळलं की, ती सीट युवराजची होती.
हे सांगताना रोहित म्हणाला, माझा टीम इंडियातील क्रश युवराज होता. दरम्यान, रोहितने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रोहित-युवराज मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरत असतं.