महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरोना चाचणीबद्दल ब्रायन लाराने दिले स्पष्टीकरण

लाराने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये लिहिले, "मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे मी अफवांमधून ऐकले आहे. मात्र, सत्य सांगणे महत्वाचे आहे. कोरोनाच्या आव्हानात्मक काळात अशा बातम्यांचा प्रसार करणे हानिकारक आहे. तुम्ही माझ्यावर वैयक्तिकरित्या प्रभाव पाडला नाही. पण, चुकीची माहिती पसरवणे हे निष्काळजीपणाचे आहे आणि यामुळे माझ्या लोकांमध्ये अनावश्यक चिंता निर्माण झाली आहे. हा व्हायरस आपण नकारात्मकता पसरवण्यासाठी वापरत नाही. मला आशा आहे, की आपण सर्वजण सुरक्षित असू. कारण भविष्यकाळात कोरोना कुठेही जाणार नाही."

By

Published : Aug 7, 2020, 6:54 AM IST

west indies legend brian lara tested negative for coronavirus
कोरोना चाचणीबद्दल ब्रायन लाराने दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली -वेस्ट इंडीजचा दिग्गज माजी कर्णधार ब्रायन लाराने आपल्या कोरोना चाचणीच्या वृत्तांबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. लाराला कोरोनाचा संसर्ग असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. मात्र, या सर्व बातम्यांना लाराने अफवा म्हटले आहे.

लाराने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये लिहिले, "मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे मी अफवांमधून ऐकले आहे. मात्र, सत्य सांगणे महत्वाचे आहे. कोरोनाच्या आव्हानात्मक काळात अशा बातम्यांचा प्रसार करणे हानिकारक आहे. तुम्ही माझ्यावर वैयक्तिकरित्या प्रभाव पाडला नाही. पण, चुकीची माहिती पसरवणे हे निष्काळजीपणाचे आहे आणि यामुळे माझ्या लोकांमध्ये अनावश्यक चिंता निर्माण झाली आहे. हा व्हायरस आपण नकारात्मकता पसरवण्यासाठी वापरत नाही. मला आशा आहे, की आपण सर्वजण सुरक्षित असू. कारण भविष्यकाळात कोरोना कुठेही जाणार नाही."

जगभरात कोरोनाचा प्रसार झाला असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ११ हजार ६९६ कोरोना रुग्ण आढळले असून ३ हजार ८८९ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, ब्राझिल, भारत या देशांमध्ये सर्वांत जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढत आहे. जगभरामध्ये एकूण 1 कोटी 82 लाख 37 हजार 573 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 6 लाख 92 हजार 851 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 14 लाख 47 हजार 153 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details