मुंबई- भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष एस. एम. के. प्रसाद यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी ऋषभच्या निवडीचे समर्थन करताना म्हटले, की विश्वकरंडकासाठी अंतिम संघ निवडण्यापूर्वी संघ व्यवस्थापन ऋषभला आणखी संधी देवू इच्छित आहे.
विश्वकरंडकापूर्वी ऋषभला आणखी संधी द्यायची आहे - एमएसके प्रसाद
प्रसाद म्हणाले, 'ऋषभ हा डावखुरा फलंदाज असल्यामुळे त्याची संघात निवड करण्यात आली आहे. ऋषभसाठी आम्ही सर्वोत्तम स्थानाचा विचार करू. आम्ही फलंदाजीत उजव्या आणि डाव्या फलंदाजांच्या भागीदारीचा फायदा घेवू.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवड करण्यात आली आहे. ऋषभ पंतला अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकच्या जागी निवडण्यात आले आहे. प्रसाद म्हणाले, 'ऋषभ हा डावखुरा फलंदाज असल्यामुळे त्याची संघात निवड करण्यात आली आहे. ऋषभसाठी आम्ही सर्वोत्तम स्थानाचा विचार करू. आम्ही फलंदाजीत उजव्या आणि डाव्या फलंदाजांच्या भागीदारीचा फायदा घेवू. त्यामुळे आम्हाला विश्वकरंडकापूर्वी ऋषभला संधी द्यायच्या आहेत.'
इंग्लंड लायन्स विरुद्ध ५ गडी बाद करत चांगली कामगिरी करणारा गोलंदाज मयांक मार्कंडेयच्या निवडीबाबत प्रसाद म्हणाले, 'आम्ही मयांकला अतिरिक्त फिरकीपटू म्हणून पाहत आहोत. यासाठीच आम्ही मयांकला सुरुवातीला भारत 'अ' संघात ठेवले आहे.'