महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

यंदाच्या आयपीएलमधून चीनच्या 'विवो'ची माघार

'विवो'चे नाते तुटल्यानंतर यंदाच्या आयपीएलला नवीन प्रायोजक मिळणार आहे. एका वृत्तानुसार, विवो 2021 मध्ये परत आयपीएलचा भाग होणार असून त्यांचा करार 2023 पर्यंत कायम राहील.

vivo wont be the ipl sponsor this year by report
यंदाच्या आयपीएलमधून चीनच्या 'विवो'ची माघार

By

Published : Aug 4, 2020, 5:24 PM IST

Updated : Aug 4, 2020, 5:30 PM IST

नवी दिल्ली - चीनची मोबाईल कंपनी विवो ही यंदाच्या आयपीएलची मुख्य प्रायोजक असणार नाही. रविवारी आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत विवोला कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याप्रकरणी अनेकांनी निषेध व्यक्त केला.

विवोचे नाते तुटल्यानंतर यंदाच्या आयपीएलला नवीन प्रायोजक मिळणार आहे. एका वृत्तानुसार, विवो 2021 मध्ये परत आयपीएलचा भाग होणार असून त्यांचा करार 2023 पर्यंत कायम राहील.

जूनमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर देशात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याविषयी मत झाले होते. त्यानंतर, प्रायोजक म्हणून आयपीएलने विवोला कायम ठेवल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सोमवारी निषेध नोंदवला. या निषेधानंतर, विवोने प्रायोजकत्वातून माघार घेतल्याची बातमी समोर आली.

बीसीसीआयने चीनी कंपनीबरोबर प्रायोजकत्व राखून ठेवत देशाचा अपमान केला आहे. लोकांनी या टी-20 लीगवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे आरएसएसशी संबंधित स्वदेशी जागरण मंचने म्हटले आहे. विवो कंपनी बीसीसीआयला मुख्य प्रायोजकत्वासाठी दरवर्षी 440 कोटी रुपये देते. विवोने 2018 मध्ये 2199 कोटींसह पाच वर्षांसाठी करार केला होता. हा करार 2022 मध्ये संपुष्टात येणार होता.

Last Updated : Aug 4, 2020, 5:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details