नवी दिल्ली - आयपीएलचे १२ वे मोसम २३ मार्चपासून रंगणार आहे. जगभरातील सर्व मोठे खेळाडू या लीगमध्ये सहभागी होणार असल्याने पूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या स्पर्धेकडे असेल. आजवर आयपीएलमध्ये अनेक विक्रम रचले गेले आहेत. असाच एक विक्रम भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावावार आहे. जो आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही खेळाडूला करता आला नाही.
आयपीएलमध्ये आजवर ११ मोसम खेळले गेले आहेत. या सर्वच्या सर्व मोसमात विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे प्रतिनिधीत्व केले आहे. आयपीएलचे सगळे हंगाम एकाच संघाकडून खेळणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे. गेली अनेक वर्षे विराट आरसीबीचे नेतृत्वही करत आहे.
कोहलीने आयपीएलमध्ये आजलर १६३ सामने खेळताना ४ हजार ९४८ धावाकेल्या आहेत. त्यात त्याने ४ शतके आणि ३४ अर्धशतके ठोकली आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराटने अनेक मालिका भारताला जिंकवून दिल्या आहेत मात्र त्याला आतापर्यंत आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही.
इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात २००८ मध्ये करण्यात आली होती. पहिल्या मोसमात शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स या संघाने आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले होते.
आयपीएलमध्ये 'असा' पराक्रम करणारा विराट एकमेव खेळाडू
कोहलीने आयपीएलमध्ये आजलर १६३ सामने खेळताना ४ हजार ९४८ धावाकेल्या आहेत. त्यात त्याने ४ शतके आणि ३४ अर्धशतके ठोकली आहेत.
virat kohli
: