महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

VIDEO : चेंडू लागल्याने पंच जखमी, इराणी चषका दरम्यानची घटना

२०१५ साली ऑस्ट्रेलियाचे जोन वार्ड तमिळनाडू आणि पंजाब यांच्यात रणजी सामन्यात पंच म्हणून काम पाहत होते. पंजाबचा फंलदाज राजविंद्र सिंहच्या एका शॉटवर ते जखमी झाले.

By

Published : Feb 17, 2019, 6:36 PM IST

नागपूर - क्रिकेटमध्ये आतापर्यंत मैदानावर आपण खेळाडू जखमी झाले असल्याचे पाहिले आहे. पण गेल्या काही दिवसांत पंचदेखील मैदानात जखमी होत असल्याच्या घटना घडत आहे. इतकेच काय सामना पाहायला येणारे दर्शकदेखील जखमी होत आहेत. नुकत्याच झालेल्या बीबीएलमध्ये एक प्रेक्षक जखमी झाला होता. शनिवारी इराणी चषकाच्या दरम्यान मैदानावरील पंच जखमी झाल्याची घटना घडली.

इराणी चषकातील सामन्यात खेळाडूच्या एका थ्रो ने पंच सीके नंदन जखमी झाले. शेष भारताच्या दुसऱ्या डावातील ९५ व्या षटकात लाँग ऑनकडून क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला. तो चेंडू थेट पंचाच्या डोक्याला लागला. चेंडू फेकतेवेळी नंदन पाठिमागे वळले आणि तो थ्रो सरळ त्यांच्या डोक्याला लागला. जोराचा फटका लागल्याने पंच जमीनवर बसून कळवळू लागले. ही घटना घडताच फिजिओ तात्काळ मैदानात धावून आले. यानंतरही पंच नंदन यांनी सामन्यात पंच म्हणून काम पाहिले.

२०१५ साली ऑस्ट्रेलियाचे जोन वार्ड तमिळनाडू आणि पंजाब यांच्यात रणजी सामन्यात पंच म्हणून काम पाहत होते. पंजाबचा फंलदाज राजविंद्र सिंहच्या एका शॉटवर ते जखमी झाले. चेंडू त्यांच्या डोक्याला लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. त्यांना कित्येक दिवस ऑब्सर्वेशनमध्ये ठेवण्यात आले होते. २०१४ साली इस्रायलमध्ये पंचाना चेंडू डोक्याला लागल्याने पंच मृत्यू पावल्याची घडना घडली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details