महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताचा इंग्लंड दौरा : भारताचे भारतासोबत रंगणार सराव सामने

पहिला सामना हॅम्प्टनशायरच्या काउंटी मैदानावर २१ ते २४ जुलै दरम्यान होईल. तर दुसरा सामना २८ ते ३१ जुलै दरम्यान ग्रेस रोड लीसेस्टरशायर येथे होईल.

By

Published : Jan 29, 2021, 5:00 PM IST

Team India to play two practice matches against India-A before tour of England
भारताचा इंग्लंड दौरा : भारताचे भारतासोबत रंगणार सराव सामने

लंडन -यंदाच्या वर्षात जुलैमध्ये भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. ट्रेंट ब्रिजवर ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या मालिकेपूर्वी भारतीय संघ भारताच्या 'अ' संघासोबत दोन सराव सामने खेळेल. नॉर्थहेप्टनशायर आणि लीसेस्टरशायर हे सराव सामने (चार-दिवसीय) आयोजित करतील.

पहिला सामना हॅम्प्टनशायरच्या काउंटी मैदानावर २१ ते २४ जुलै दरम्यान होईल. तर दुसरा सामना २८ ते ३१ जुलै दरम्यान ग्रेस रोड लीसेस्टरशायर येथे होईल. लीसेस्टरशायरचे अध्यक्ष महमूद ड्यूक म्हणाले, "इंग्लंडबरोबरच्या कसोटी मालिकेपूर्वी अंतिम सराव सामन्यात या स्टार खेळाडूंना पाहणे जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक अनोखी संधी असेल."

हेही वाचा - ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची प्रेयसी संकटात...वाचा कारण

ते म्हणाले, "तिकीटांना मागणी जास्त असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. विक्रीची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल आणि आम्ही चाहत्यांना याबद्दल अधिक माहिती सोशल मीडिया आणि लीसेस्टरशायरच्या वेबसाइटवर कळवू."

मार्चमध्ये दोन्ही सामन्यांची तिकिटे विक्रीस येणार आहेत. नॉर्थहेप्टनशायरने अद्याप तिकीट विक्रीच्या तारखांची घोषणा केलेली नाही. दुसर्‍या सराव सामन्यासाठी १५ मार्चपासून तिकीट विक्री करणार असल्याचे लीसेस्टरशायरने सांगितले.

भारताचा इंग्लंड दौरा -

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ ऑगस्टपासून ट्रेंट ब्रिजवर खेळला जाईल. त्यानंतर दोन्ही संघ १२ ऑगस्टपासून लॉर्ड्स येथे दुसरा कसोटी सामना खेळतील. तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे तर, चौथा कसोटी सामना २ सप्टेंबरपासून ओव्हल येथे खेळला जाईल. अंतिम कसोटी सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details