महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

VIDEO : तिसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाने मैदानात गाळला घाम

टीम इंडियाने या सामन्यापूर्वी मैदानात कसून सराव केला. या सरावात क्षेत्ररणाकडे सर्वात जास्त लक्ष देण्यात आले. या मालिकेत टीम इंडियाने क्षेत्ररणात गचाळ कामगिरी केली आहे.

Team India practiced fiercely before the third ODI, watch the video
VIDEO : तिसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाने मैदानात गाळला घाम

By

Published : Dec 21, 2019, 7:59 PM IST

कटक -भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना बाराबती स्टेडियम कटक येथे खेळवण्यात येणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत आत्तापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना खिशात घातला आहे. त्यामुळे उद्या रंगणारा हा सामना चाहत्यांसाठी उत्सुकतेचा असणार आहे.

हेही वाचा -अंतिम वन-डेपूर्वी शिवम आणि होल्डर खेळताहेत टेबल टेनिस, पाहा व्हिडिओ

टीम इंडियाने या सामन्यापूर्वी मैदानात कसून सराव केला. या सरावात क्षेत्ररणाकडे सर्वात जास्त लक्ष देण्यात आले. या मालिकेत टीम इंडियाने क्षेत्ररणात गचाळ कामगिरी केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी महत्वाचे झेल सोडले. त्यामुळे या सर्व चुका सुधारण्याचा आणि सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे.

भारतीय संघ सराव करताना

या मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे पार पडला. या सामन्यात विंडीजने आठ विकेट्सने विजय नोंदवत मालिकेत आघाडी घेतली. पण, त्यानंतरच्या विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन करत १०७ धावांनी विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरी साधली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details