नवी दिल्ली -सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेचा पहिला उपांत्यपूर्व सामना २६ जानेवारी रोजी कर्नाटक आणि पंजाब यांच्यात खेळला जाईल. तर, दुसरा उपांत्यपूर्व सामना त्याच दिवशी तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश यांच्यात खेळला जाईल.
हेही वाचा - जुव्हेंटसच्या विजयासोबत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विश्वविक्रम
२७ जानेवारीला तिसरा उपांत्यपूर्व सामना हरयाणा आणि बडोदा यांच्यात रंगणार आहे. या दिवशी राजस्थान आणि बिहार यांच्यात चौथ्या उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. दुसर्या आणि चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यातील विजेते संघ २९ जानेवारीला पहिल्या उपांत्य सामन्यासाठी आमने सामने असतील. तर, याच दिवशी पहिल्या आणि तिसर्या उपांत्यपूर्व सामन्यातील विजेते संघ आपला उपांत्य सामना खेळतील.
या स्पर्धेचा अंतिम सामना ३१ जानेवारी रोजी होईल. बाद फेरीतील सर्व सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळले जातील.