नवी दिल्ली - गेल्या काही वर्षापासून बीसीसीआयने सुनावलेल्या आजीवन बंदीविरोधात श्रीसंत सर्वोच्च न्यायालयात लढा देत होता. आज त्याच्या लढ्याला यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवली आहे. बीसीसीआयला याबाबत ३ महिने विचार करण्याचा कालावधी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवली
सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवली आहे. बीसीसीआयला याबाबत ३ महिने विचार करण्याचा कालावधी दिला आहे.
आयपीएलच्या २०१३ च्या हंगामात स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी बीसीसीआयने 'झीरो टॉलेरंस पॉलिसी' अंतर्गत श्रीसंतवर आजीवन क्रिकेटबंदी घातली होती. श्रीसंतने या निर्णयाविरुद्ध केरळच्या उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, केरळच्या उच्च न्यायालयाने बीसीसीआयचा निर्णय अंतिम ठेवत आजीवन बंदी कायम ठेवली होती.
यानंतर, श्रीसंतने सर्वोच्च न्यायालयात आजीवन बंदीच्या निर्णयाविरुद्ध धाव घेतली. अनेक सुनावण्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवली आहे.