महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२१ : डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबादला 'या' तीन चूका पडल्या महागात

सनरायजर्स हैदराबादचा रविवारी झालेल्या सामन्यात पराभव झाला. कोलकाता नाईट रायडर्सने हा सामना १० धावांनी जिंकला. या सामन्यात हैदराबाद संघाकडून काही चूका झाल्या आणि त्यांना त्या चांगल्याच महागात पडल्या.

sunrisers hyderabad made 3 mistakes and they lost match against kolkata night riders by 10 runs
IPL २०२१ : डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबादला 'या' तीन चूका पडल्या महागात

By

Published : Apr 12, 2021, 1:15 PM IST

Updated : Apr 12, 2021, 2:35 PM IST

चेन्नई - डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायजर्स हैदराबादचा रविवारी झालेल्या सामन्यात पराभव झाला. कोलकाता नाईट रायडर्सने हा सामना १० धावांनी जिंकला. या सामन्यात हैदराबाद संघाकडून काही चूका झाल्या आणि त्यांना त्या चांगल्याच महागात पडल्या. वाचा कोणत्या आहेत त्या चूका....

  • भुवनेश्वर-संदीप शर्मा जोडी ठरली महागडी

हैदराबादच्या गोलंदाजांना कोलकाता नाईट रायडर्सच्या धावांवर लगाम लावताआला नाही. खास करून नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ही जोडी बाद झाल्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी काही अंशी ताबा मिळवला. पण कोलकाताच्या डावाच्या अखेरच्या षटकात हैदराबादचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार चांगलाच महागडा ठरला. या षटकात त्याने १६ धावा बहाल केल्या. याशिवाय संदीप शर्मा देखील महागडा ठरला. भुवनेश्वरने ४ षटकांमध्ये ४५ धावा, तर संदीपने ३ षटकांमध्ये ३५ धावा दिल्या. या गोष्टीचा मोठा फटका हैदराबादच्या संघाला बसला.

  • वॉर्नरला जीवदान मिळून ठरला अपयशी

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला पहिल्याच षटकात फक्त एका धावेवर असताना जीवदान मिळाले. पण याचा फायदा वॉर्नरला उठवता आला नाही. कोलकाताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने पुढच्या षटकात वॉर्नरला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. वॉर्नरला यावेळी तीन धावांवर समाधान मानावे लागले. हैदराबादसाठी हा एक मोठा धक्का होता.

  • नबीला वरच्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी पाठवणे पडलं महागात

हैदराबादला विजयासाठी प्रति षटक ११ धावांची गरज असताना, जॉनी बेयरस्टो बाद झाल्यानंतर हैदराबाद संघाने मोहम्मद नबीला फलंदाजीसाठी पाठवले. नबीने संथ खेळ केला. परिणामी दडपण वाढत गेले. नबीने ११ चेंडूत अवघ्या १४ धावा केल्या. त्यानंतर विजय शंकरने ७ चेंडूत ११ धावा केल्या. शंकर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या अब्दुल समदने ८ चेंडूत नाबाद १९ धावा करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. अब्दुल समदकडे मोठे फटके मारण्याचे कौशल्य असताना हैदराबादने त्याला खालच्या फळीत फलंदाजीसाठी पाठवले. हे देखील हैदराबाद संघाच्या पराभवाच्या कारणांपैकी एक ठरले.

हेही वाचा -RR vs PBKS : राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज कडवी झुंज

हेही वाचा -KKR Vs SRH : कोलकाता नाईट रायडर्सची विजयी सुरुवात; सनरायजर्स हैदराबादचा 10 धावांनी पराभव

Last Updated : Apr 12, 2021, 2:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details