महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विल्यम्सनला हटवून सनरायझर्स हैदराबादने नेमला नवा कर्णधार!

विल्यम्सनच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने २०१८ मध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात मात्र, सनरायझर्सला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाला सामोरे जावे लागले. वॉर्नर आता कर्णधार म्हणून केन विल्यम्सनची जागा घेईल.

Sunrisers Hyderabad appointed David Warner as a captain for ipl 2020
विल्यम्सनला हटवून सनरायझर्स हैदराबादने नेमला नवा कर्णधार!

By

Published : Mar 11, 2020, 9:16 AM IST

Updated : Mar 11, 2020, 12:37 PM IST

हैदराबाद - सनरायझर्स हैदराबादने 29 मार्चपासून सुरू होणार्‍या इंडियन प्रीमियर लीग 2020 साठी डेव्हिड वॉर्नरला आपला कर्णधार म्हणून नेमले आहे. वॉर्नर आता कर्णधार म्हणून केन विल्यम्सनची जागा घेईल. विल्यम्सनने २०१८ आणि २०१९ मध्ये संघाचे नेतृत्व केले होते. बॉल टेम्परिंगच्या वादानंतर वॉर्नरच्या जागी विल्यम्सनला २०१८ मध्ये संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते.

हेही वाचा -विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला हवाय धोनीसारखा खेळाडू!

विल्यम्सनच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने २०१८ मध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात मात्र, सनरायझर्सला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेत विल्यम्सनने सर्वाधिक ७३५ धावा केल्या. गेल्या वर्षी, एलिमिनेटरमध्ये सनरायझर्सचा पराभव झाला होता. हैदराबादचा संघ लीगमध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता.

वॉर्नरने यापूर्वी २०१५ ते २०१७ दरम्यान संघाचे नेतृत्व केले होते. २०१६ मध्ये सनरायझर्सने विजेतेपद जिंकले. वॉर्नरने सनरायझर्सकडून एकूण ४५ सामन्यांचे नेतृत्व केले असून त्यापैकी २६ सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. विल्यमसनने २६ पैकी १४ सामने जिंकले आहेत.

कर्णधारपद सोपविल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने संघ व्यवस्थापनाचे आभार मानले. टीमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये वॉर्नर म्हणाला, 'कर्णधार झाल्याने मला खूप आनंद झाला. मी संघ व्यवस्थापनाचे आभार मानतो'. वॉर्नरने केन विल्यमसन आणि भुवनेश्वर कुमार यांचेही आभार मानले आहेत.

Last Updated : Mar 11, 2020, 12:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details