महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 26, 2019, 9:51 AM IST

Updated : Oct 26, 2019, 9:59 AM IST

ETV Bharat / sports

श्रीशांतने उडवला सचिनचा त्रिफळा, पाहा व्हिडिओ

श्रीशांतने केरळचा फलंदाज सचिन बेबीला क्लीन बोल्ड केले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या पुनरागमनाचे संकेत पाहून चाहतेही खुश झाले आहेत. श्रीशांत आपल्या क्रिकेट कारकिर्दीत परतण्यास उत्सुक असून स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेल्या श्रीशांतला बीसीसीआयने दिलासा दिला. बीसीसीआयने श्रीशांतवरची आजीवन बंदी ७ वर्षाने कमी केली.

श्रीशांतने उडवला सचिनचा त्रिफळा, पाहा व्हिडिओ

कोची -भारताचा वेगवान गोलंदाज श्रीशांत सध्या पुनरागमनाच्या तयारीत असून त्याचा सरावादरम्यानचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये श्रीशांतने गोलंदाजी करताना फलंदाजाचा त्रिफळा उध्वस्त केला.

हेही वाचा -टीम इंडिया प्रकाशझोतातील कसोटी खेळताना दिसणार, गांगुली विराटमध्ये एकमत

श्रीशांतने केरळचा फलंदाज सचिन बेबीला क्लीन बोल्ड केले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या पुनरागमनाचे संकेत पाहून चाहतेही खुश झाले आहेत. श्रीशांत आपल्या क्रिकेट कारकिर्दीत परतण्यास उत्सुक असून स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेल्या श्रीशांतला बीसीसीआयने दिलासा दिला होता. बीसीसीआयने श्रीशांतवरची आजीवन बंदी ७ वर्षाने कमी केली.

मार्च २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने श्रीशांतवरची आजीवन बंदी हटवली होती. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला या बंदीबद्दल विचार करण्यास सांगितले होते. ही बंदी जास्त असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. न्यायमूर्ती डी. के. जैन म्हणाले, 'श्रीशांतचे वय आता ३५ वर्षांपलिकडे झाले आहे. त्याने आपल्या क्रिकेटचा चांगला काळ मैदानाबाहेर घालवला असून जवळपास ६ वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याच्यावरील आजीवन बंदी उठवून त्याला ७ वर्षांच्या बंदीची शिक्षा देण्यात आली आहे. त्याच्या या बंदीचा कालावधी सप्टेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करु शकतो.

श्रीशांत या बंदीतून १३ सप्टेंबर २०२० ला सुटणार आहे. २००५ मध्ये श्रीशांतने श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००६ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. २७ कसोटीत त्याने ८७ तर ५३ एकदिवसीय सामन्यात त्याने ७५ विकेट्स घेतल्या आहेत.

Last Updated : Oct 26, 2019, 9:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details