कोलकाता - भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचे पूर्व प्रशिक्षक अशोक मुस्तफी यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. गांगुलीला याची माहिती होताच त्याने, मुस्तफी यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च स्वत: उचलण्याचा निर्णय घेतला. गांगुलीच्या या 'दरियादिली'चे क्रिकेटविश्वातून कौतुक होत आहे.
अशोक मुस्तफी यांना बंगालचे रमाकांत आचरेकर असे म्हटले जाते. बंगाल क्रिकेटरसाठी त्यांचे योगदान अमुल्य आहे. मुस्तफी यांना वाढत्या वयोमानानुसार त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे शनिवारी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुस्तफी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती गांगुलीचा मित्र संजय दास याने त्याला दिली. तेव्हा गांगुलीने मुस्तफी यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. तसेच त्याने मुस्तफी यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च स्वत: करणार असल्याचे दास याला सांगितले. दरम्यान, मुस्तफी आपल्या घरात एकटेच राहतात. कारण त्यांची मुलगी सद्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे.