महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'इज्जती'ने निवृत्ती घ्या, असे म्हणणाऱ्या रमीज राजा यांना मलिक म्हणाला...

रमीज यांच्या निवृत्तीच्या सल्ल्यावर शोएब मलिकने, मी तुमच्या मताशी सहमत असून आपण तिघे निवृत्ती घेऊ, असे उत्तर दिले आहे. दरम्यान, रमीज यांनी नव्या खेळाडूंना संधी मिळावी, या उद्देशाने सल्ला दिला होता.

By

Published : Apr 9, 2020, 10:54 AM IST

shoaib malik hits back at ramiz raja of he should retire with mohammad hafeez
'इज्जती'ने निवृत्ती घ्या, असे म्हणणाऱ्या रमीज राजा यांना मलिक म्हणाला...

कराची - पाकिस्ताने माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक रमीज राजा यांनी पाकचे अनुभवी खेळाडू मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा सल्ला दिला होता. रमीज यांच्या सल्ल्यावर शोएब मलिकने, मी तुमच्या मताशी सहमत असून आपण तिघे निवृत्ती घेऊ, असे उत्तर दिले आहे. दरम्यान, रमीज यांनी नव्या खेळाडूंना संधी मिळावी, या उद्देशाने सल्ला दिला होता.

शोएब मलिकने रमीज राजा यांना ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. तो म्हणतो, 'रमीज भाऊ, मी तुमच्या मताशी असून आपण तिघेही करियच्या अंतिम टप्प्यात आहोत. चला तर मग तिघेही इज्जतीने निवृत्ती घेऊ. मी फोन करतो आणि आपण २०२२ मध्ये निवृत्तीबाबत योजना आखूयात.'

दरम्यान, शोएबने या ट्विटला मोहम्मद हाफिजलाही टॅग केले आहे. रमीज राजा यांनी एका वृत्तवाहिनीशी व्हिडिओ कॉलच्या माध्यामातून बातचित केली. यात त्यांनी, मी नेहमी खेळाडूंच्या व्यक्तिगत विषयावर भाष्य करणे टाळतो. हाफिज आणि मलिक यांनी पाकिस्तान क्रिकेटची सेवा केली आहे. यात दुमत नाही. पण मला वाटत की, त्यांनी आता निवृत्ती घ्यायला हवी. ही त्यांच्यासाठी योग्य वेळ आहे, असे म्हटले होते.

तसेच राजा यांनी, मलिक आणि हाफिज यांनी निवृत्ती घेतली तर याचा फायदा पाकिस्तान संघालाच होईल. पाकिस्तानकडे चांगले खेळाडू आहेत. त्यांना घेऊन संघाला पुढे जाता येईल, असेही म्हटले होते.

हेही वाचा -गांगुलीची 'दरियादिली', गुरुंच्या उपचाराचा खर्च उचलणार

हेही वाचा -'कोरोनाविरुद्धच्या लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवा'

ABOUT THE AUTHOR

...view details