महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शेन वॉर्नच्या ड्रायव्हिंगवर एका वर्षाची बंदी

द टेलिग्राफच्या वृत्तानुसार वॉर्नला आता वर्षभर ड्रायव्हिंगसाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. दोन वर्षातून सहावेळा वॉर्नने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. मागच्या वर्षी त्याने लंडनमध्ये आपल्या जॅग्वार गाडीने ६४ किमी प्रतितासाचा नियम मोडला होता.

शेन वॉर्नच्या ड्रायव्हिंगवर एका वर्षाची बंदी

By

Published : Sep 24, 2019, 7:38 AM IST

लंडन - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. अ‌ॅशेस मालिकेदरम्यान लंडनमधील घरात पार्टी केल्यामुळे शेजाऱ्यांनी वॉर्नला धारेवर धरले होते. आता वॉर्न एका नव्या अ़डचणीत सापडला आहे. फिरकीचा जादुगार वॉर्नला आता वर्षभरासाठी गाडी चालवता येणार नाही.

हेही वाचा -ब्रॅडमन यांना १०० सरासरीपासून वंचित ठेवणारा उमदा खेळाडू हरपला - शरद पवार

द टेलिग्राफच्या वृत्तानुसार वॉर्नला आता वर्षभर ड्रायव्हिंगसाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. दोन वर्षातून सहावेळा वॉर्नने वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. मागच्या वर्षी त्याने लंडनमध्ये आपल्या जॅग्वार गाडीने ६४ किमी प्रतितासाचा नियम मोडला होता.

शिवाय वॉर्न न्यायालयीन सुनावणीला गैरहजर राहिला होता. त्याला ३००० अमेरिकन डॉलर्सचा दंडही भरावा लागणार आहे. वॉर्नच्या या प्रकरणावर न्यायाधीश एद्रियन टर्नर म्हणाले, 'एप्रिल २०१६ ते ऑगस्ट २०१८ दरम्यान वॉर्नने वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्यावर वर्षभराची बंदी घालण्यात आली आहे.'

ABOUT THE AUTHOR

...view details