महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 3, 2021, 3:46 PM IST

ETV Bharat / sports

आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरस्कारासाठी अश्विनला नामांकन

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३४ वर्षीय अश्विनने फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. अश्विनने दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या डावात १०६ धावा केल्या, तर तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या कारकीर्दीत ४०० बळी घेण्याचा पराक्रम केला. अश्विनने तीन कसोटी सामन्यांमध्ये १७६ धावा केल्या असून त्याने २४ विकेट्स घेतल्या आहेत.

रवीचंद्रन अश्विन लेटेस्ट बातमी
रवीचंद्रन अश्विन लेटेस्ट बातमी

दुबई -भारताचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि वेस्ट इंडीजचा काइल मेयर्स यांना आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) फेब्रुवारी महिन्याच्या सर्वोत्तम पुरस्कारासाठी पुरुष व महिला खेळाडूसाठी नामांकने जाहीर केली. महिलांमध्ये इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट, न्यूझीलंडची ब्रूक हालीडे आणि इंग्लंडची नताली स्कीव्हर यांना नामांकन मिळाले आहे.

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३४ वर्षीय अश्विनने फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. अश्विनने दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या डावात १०६ धावा केल्या. तर, तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या कारकीर्दीत ४०० बळी घेण्याचा पराक्रम केला. अश्विनने तीन कसोटी सामन्यांमध्ये १७६ धावा केल्या असून त्याने २४ विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने श्रीलंका आणि भारताविरुद्ध सलग तीन शतके केली. त्याने भारताविरुद्ध फक्त फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. रूटने तीन सामन्यांत ३३३ धावा केल्या आणि ६ विकेट्स घेतल्या. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात रूटने २१८ धावा केल्या होत्या. मेयर्सने पदार्पणाच्या कसोटी बांगलादेशविरुद्ध २१० धावा केल्या होत्या. त्याने पहिल्या कसोटीत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

महिलांमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तीनही सामन्यांमध्ये ब्युमोंटने अर्धशतके झळकावली आणि संघाला मालिका जिंकण्यात मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या मालिकेत तिने २३१ धावा केल्या. हालीडेनेही इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी बजावत मालिकेत ११० धावा केल्या आणि २ बळी घेतले. स्कीव्हरने मालिकेत ९६ धावा केल्या आणि ५ बळी घेतले. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत स्कीव्हर सर्वाधिक घेणारी गोलंदाज ठरली.

हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : चौथ्या कसोटीत भारत 'या' गोलंदाजाला खेळवणार?

ABOUT THE AUTHOR

...view details