महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पृथ्वी शॉ दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातील सराव सामन्यातून बाहेर

पृथ्वीवर बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची दुखापत गंभीर असल्याचे समजते.

By

Published : Jan 7, 2020, 11:18 PM IST

prithvi shaw ruled out of india a practice matches in new zealand with injury
पृथ्वी शॉ दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातील सराव सामन्यातून बाहेर

मुंबई - भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातील सराव सामन्यात खेळू शकणार नाही. पृथ्वीला रणजी सामन्यादरम्यान, दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्याने, बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई कर्नाटक रणजी सामन्यादरम्यान, पृथ्वी शॉच्या खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला नव्हता.

पृथ्वी शॉच्या खांद्याला दुखापत झाली तो क्षण...

पृथ्वीवर बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची दुखापत गंभीर असल्याचे समजते. भारतीय अ संघ न्यूझीलंड दौऱ्यात २ सराव सामने खेळणार आहे. पृथ्वीची या सामन्यांसाठी भारतीय अ संघात निवड करण्यात आली होती.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी सांगितले की, 'पृथ्वी शॉवर बंगळुरु अकॅडमीमध्ये उपचार सुरू आहेत. सद्या तो न्यूझीलंड दौऱ्यातील सराव सामन्यात, भारतीय अ संघात खेळू शकणार नाही. पण एकदिवसीय आणि ४ दिवसीय सामन्यांतील त्यांच्या समावेशाबाबत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे.'

हेही वाचा -IND vs SL T-२० : भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, मालिकेत १-० ने आघाडी

हेही वाचा -INDvsAUS : लँगरची भारत दौऱ्यातून माघार, ऑस्ट्रेलिया 'या' प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात खेळणार

ABOUT THE AUTHOR

...view details