महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

५२ चेंडूत नाबाद १०६ ठोकत नेपाळच्या खेळाडूने रचला टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास

धावांचा पाठलाग करुन विजय मिळवण्यात विराट अव्वल समजला जातो. त्याने अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. मात्र, विराटलाही धावांचा पाठलाग करताना टी-२० सामन्यात शतक ठोकता आलेले नाही. पारस या विक्रमासह नेपाळकडून टी-२० क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. सिंगापूर विरुध्दच्या सामन्यात पारसने ५२ चेंडूत नाबाद १०६ धावा तडकावल्या. त्याने या खेळीत ७ चौकार आणि ९ गंगनचुंबी षटकार ठोकले.

५२ चेंडूत नाबाद १०६ ठोकत नेपाळच्या 'या' खेळाडूने रचला टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास

By

Published : Sep 28, 2019, 11:39 PM IST

Updated : Sep 28, 2019, 11:48 PM IST

सिंगापूर- येथे सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार पारस खडकाने शनिवारी इतिहास घडवला. सिंगापूरविरुध्दच्या टी-२० लढतीत पारसने नाबाद शतकी खेळी केली. पारसच्या या खेळीच्या जोरावर नेपाळने हा सामना ९ गडी राखून जिंकला. महत्वाची गोष्ट म्हणजे, टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना शतकी खेळी करण्याचा मान पारसच्या नावे जमा झाला आहे. आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही.

धावांचा पाठलाग करुन विजय मिळवण्यात विराट अव्वल समजला जातो. त्याने अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. मात्र, विराटलाही धावांचा पाठलाग करताना टी-२० सामन्यात शतक ठोकता आलेले नाही. पारस या विक्रमासह नेपाळकडून टी-२० क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. सिंगापूर विरुध्दच्या सामन्यात पारसने ५२ चेंडूत नाबाद १०६ धावा तडकावल्या. त्याने या खेळीत ७ चौकार आणि ९ गंगनचुंबी षटकार ठोकले.

नेपाळ आणि सिंगापूर यांच्यात झालेल्या सामन्यात यजमान सिंगापूरने प्रथम फलंदाजी करत कर्णधार टी डेव्हिड (नाबाद ६४), एस चंद्रमोहन (३५) आणि जनक प्रकाश (२५) यांच्या धावांच्या मदतीने निर्धारीत २० षटकांत ३ बाद १५१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेपाळने १६ षटकांत १ विकेट गमावत हे लक्ष्य पार केले.

हेही वाचा ःपाकिस्तानच्या खेळाडूंशी 'पंगा' घेणे माझी आवड, भारतीय फलंदाजाचा खुलासा

हेही वाचा ः'संघासाठी खडतर निर्णय घेणाऱ्या धोनीला निवृत्ती कधी घ्यायची कळतं'

Last Updated : Sep 28, 2019, 11:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details