महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

VIDEO : मेरे हालात ऐसे हैं कि.., मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूला करावं लागतंय घरकाम

सूर्यकुमार यादव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो घरची कामे करताना दिसत आहे. यादरम्यान, त्याच्या शेजारी त्याचा कुत्राही बसलेला दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याला, सूर्य कुमारने, माझ्यावर अशी परिस्थिती आली आहे की, पाब्लोही माझ्याकडे बघत नाही आहे, असे कॅप्शन दिले आहे.

By

Published : Mar 29, 2020, 8:41 AM IST

mumbai indians surya kumar yadav shared video social media telling people circumstances due coronavirus
VIDEO : मेरे हालात ऐसे हैं कि.., मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूला करावं लागतंय घरकाम

मुंबई - कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. घरगुती कामे करणारे लोकही रजेवर आहेत. यामुळे अनेकांची गोची झाली आहे. अशीच गोची मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवची देखील झाली आहे. सूर्यकुमारने आपला एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

सूर्यकुमार यादव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो घरची कामे करताना दिसत आहे. यादरम्यान, त्याच्या शेजारी त्याचा कुत्राही बसलेला दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याला, सूर्य कुमारने, माझ्यावर अशी परिस्थिती आली आहे की, पाब्लोही माझ्याकडे बघत नाही आहे, असे कॅप्शन दिले आहे.

सूर्यकुमारच्या या व्हिडीओत सूर्य कुमार काम करताना मागे, 'मेरे हालात ऐसे हैं कि मैं कुछ कर नहीं सकता' हे गाणे वाजताना दिसत आहे. सूर्य कुमार यादव सोशल मीडियावर खासकरुन टिकटॉकवर खूप अ‍ॅक्टिव असतो. तो पत्नी देवीशाबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतो.

दरम्यान, आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे. मात्र यंदाच्या आयपीएल हंगाम कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. सुरूवातीला ही स्पर्धा २९ मार्चापासून सुरू होणार होती. पण देशात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता बीसीसीआयने ही स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण सद्यपरिस्थिती पाहता, आयपीएल रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतचे संकेत बीसीसीआय आणि फ्रेंचायझीच्या मालकांनी दिले आहेत.

सूर्यकुमार यादवच्या आधी भारतीय संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनही आपल्या घरात कपडे धुताना आणि कमोड स्वच्छ करताना दिसून आला आहे. शिखरने कोरोनामुळे काय काम करावी लागत आहेत, असे सांगत व्हिडिओ शेअर केला होता.

हेही वाचा -लॉकडाऊन : पंत सद्या काय करतो, BCCI ने शेअर केला व्हिडिओ

हेही वाचा -कोरोनाविरूद्धच्या लढ्यात बीसीसीआयची उडी, ५१ कोटींंची मदत जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details