महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयपीएलमध्ये २०० षटकार मारणार धोनी ठरला पहिला भारतीय फलंदाज

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर

धोनी

By

Published : Apr 22, 2019, 4:40 PM IST

बंगळुरु - आयपीएलमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा केवळ एका धावेने पराभव केला. या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला असला तरी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात धोनी आयपीएलमध्ये २०० षटकार मारणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.


एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात धोनीने ४८ चेंडूत ८४ धावांची खेळी करत हा विक्रम आपल्या नावावर केला. मात्र धोनीची ही खेळी चेन्नईला या सामन्यात विजय मिळवून देऊ शकली नाही. बंगळुरूने दिलेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला २० षटकात आठ गडी गमावून १६० धावाच करता आल्या.

धोनी


या सामन्यात धोनीने आपल्या वादळी खेळीत ४ चौकार आणि ७ खणखणीत षटकारांचा समावेश होता. धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये २०३ षटकार खेचले आहेत. बाराव्या मोसमात ३७ वर्षीय धोनीने आतापर्यंत १७ षटकार लगावले आहेत.


आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा आणि सुरेश रैना दुसऱ्या स्थानावर आहेत. त्या दोघांनीही आयपीएलमध्ये प्रत्येकी १९० षटकार लगावले आहेत. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ३२३ षटकार ठोकले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details