साऊदॅम्प्टन - अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताने अफगानिस्तावर ११ धावांनी विजय मिळवला. या लढतीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक केली. ही या विश्वषकातील पहिलीच हॅट्रीक आहे. शमीने शेवटच्या तीन फलंदाजांना तंबूची वाट दाखवत हॅट्ट्रिक नोंदवली.
WC IND vs AFG :मोहम्मद शमीची ऐतिहासिक कामगिरी, विश्वचषकात हॅट्ट्रिक नोंदवणारा दुसरा भारतीय
शमीने शेवटच्या तीन फलंदाजांना तंबूची वाट दाखवत हॅट्ट्रिक नोंदवली.
यापूर्वी १९८७ च्या विश्वषचकात भारताच्या चेतन शर्माने पहिली हॅट्ट्रिक केली होती. त्यानंतर विश्वषचकात हॅट्ट्रिक करणारा शमी हा भारताचा दुसरा गोलंदाज आहे. क्रिकेट विश्वचषकामध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारा शमी हा दहावा गोलदांज आहे. या विश्वषकात भारताचा हा सलग ४ था विजय आहे. आता भारताचे ९ गुण झाले असून, गुणतालिकेत भारत तिसऱ्या क्रमाकांवर आहे.
अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला खरा, पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. भारताने अफगाणिस्तानपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग अफगाणिस्तानला करता आला नाही. अफगानिस्तानचा संघ २१३ धावाच करु शकला.