लंडन -यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओव्हरथ्रोचे मोठे नाट्य घडले होते. या ओव्हरथ्रोनंतर, पंचांनी दिलेल्या निर्णयावर टीकेचा भडीमार झाला होता. आता याच ओव्हरथ्रोचे समीक्षण होणार आहे.
विश्वकरंडकातील 'त्या' ओव्हरथ्रोचे होणार समीक्षण, या क्लबने घेतली जबाबदारी
मेरीलबॉर्न क्रिकेट क्लब (MCC) या ओव्हरथ्रोचे समीक्षण करणार आहे.
मेरीलबॉर्न क्रिकेट क्लब (MCC) या ओव्हरथ्रोचे समीक्षण करणार आहे. एमसीसीने दिलेल्या माहितीनुसार, 'वर्ल्ड क्रिकेट समिती (डब्ल्यूसीसी) ओव्हरथ्रोच्या संबंधित कलम १९.८ वर विचार करणार आहे.' हा निर्णय विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला विचारात ठेऊन घेण्यात येणार आहे. डब्ल्यूसीसीने म्हटल्याप्रमाणे, या प्रकरणावर सप्टेंबर २०१९ मध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.
आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दिलेल्या या चार धावांच्या ओव्हरथ्रोवर खूप वादविवाद झाले होते. या धावा दोन्ही संघांच्या निर्णयावर परिणाम करु शकल्या असत्या. त्यावेळी उपस्थित पंच कुमार धर्मसेनाने यांनी सहा धावा इंग्लंडला दिल्या होत्या. या विवादानंतर, धर्मसेना यांनी आपली चूक मान्य केली आहे.