झारखंड -भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आज सहकुटुंब लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. झारखंडमधील रांचीतील जवाहर विद्या मंदिर मतदान केंद्रावर त्याने मतदान केले.
कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीने सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज झारखंडसह ७ राज्यांमधील ५१ मतदार संघांमध्ये मतदान झाले
महेंद्रसिंह धोनीने सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
'कॅप्टन कूल' धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी आणि आई-वडिलांनीही मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे धोनीसोबत मुलगी झीवाही मतदान केंद्रावर उपस्थित होती.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज झारखंडसह उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या ७ राज्यांमधील ५१ मतदार संघांमध्ये मतदान झाले आहे. यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १४ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.