महाराष्ट्र

maharashtra

रणजी ट्रॉफी : महाराष्ट्र-छत्तीसगड लढत अनिर्णित

पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर महाराष्ट्राला तीन तर छत्तीसगडला एका गुणावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

By

Published : Dec 28, 2019, 11:44 PM IST

Published : Dec 28, 2019, 11:44 PM IST

Maharashtra-Chhattisgarh battle drawn in Ranji Trophy
रणजी ट्रॉफी : महाराष्ट्र-छत्तीसगड लढत अनिर्णित

पुणे -कालच्या १ बाद ३९ धावसंख्येवरून पुढे खेळताना अखेरच्या दिवशी ११० धावांची भर घालत महाराष्ट्राने डाव घोषित केला. त्यामुळे छत्तीसगड विरूद्धची ही लढत अनिर्णित सुटली आहे. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर महाराष्ट्राला तीन तर छत्तीसगडला एका गुणावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

हेही वाचा -दिग्गज खेळाडू झ्लाटन इब्राहिमोविच एसी मिलानशी करारबद्ध

डाव घोषित करण्याच्या वेळेस महाराष्ट्राने ३ बाद १४९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात महाराष्ट्राकडून ऋतुराज गायकवाडने ७६ तर सत्यजित बच्छावने नाबाद ५२ धावांची खेळी केली. छत्तीसगडकडून दुसऱ्या डावात गोलंदाजीमध्ये सुमित रूईकरने २ तर ओकांर वर्माने १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, पहिल्या डावात ऋतुराज गायकवाडच्या १०८ आणि विशांत मोरेच्या ५३ धावांच्या जोरावर महाराष्ट्राने २८९ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या छत्तीसगडचा संघ २८६ धावा करू शकला. छत्तीसगडकडून पहिल्या डावात हरप्रीत सिंग भाट्टियाने ९०, अमनदीप खरेने ४० आणि अजय मंडलने ३५ धावा केल्या होत्या. महाराष्ट्राकडून पहिल्या डावात गोलंदाजीत संकलेचाने ३, खुराणाने ३ आणि चौधरीने २ गडी बाद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details