महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Women's T२० WC २०२० : पावसामुळे उपांत्य सामना रद्द, टीम इंडिया प्रथमच अंतिम फेरीत

पावसामुळे उपांत्य फेरीचा सामना रद्द करण्यात आला असून भारतीय संघ गुणांच्या आधारावर अंतिम फेरीत पोहोचला आहे.

LIVE Score, India vs England, Women's T20 World Cup Semi-Final: India-England Match Toss Delayed Due To Rain In Sydney
Women's T२० WC २०२० : पावसामुळे उपांत्य सामना रद्द, टीम इंडिया अंतिम फेरीत

By

Published : Mar 5, 2020, 9:25 AM IST

Updated : Mar 5, 2020, 11:42 AM IST

सिडनी- आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. गुणांच्या आधारावर भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. टी-२० च्या इतिहासात भारतीय संघाला प्रथमच अंतिम फेरी गाठता आली आहे.

सिडनी मैदानावर सकाळापासून पावसाची हजेरी होती. सामना सुरू होण्यासाठी अखेरची वेळ ११.०६ मिनिटे होती. पण पावसामुळे नाणेफेक देखील होऊ शकली नाही. यामुळे पंचांनी सामना रद्द करण्यात आला असल्याची घोषणा केली.

भारतीय महिला संघ आयसीसी टी-२० विश्व करंडक स्पर्धेत अपराजित राहून अंतिम फेरीत दाखल झाला आहे. अंतिम फेरीत पोहोचण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली आहे. याआधी भारत २००९, २०१० आणि २०१८ मध्ये उपांत्य फेरीत दाखल झाला होता.

दरम्यान, आयसीसी विश्वकरंडकाचा दुसरा उपांत्य सामना याच मैदानावर दुपारी होणार आहे. ही लढत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. जर लढत देखील पावसामुळे रद्द झाल्यास ग्रुप फेरीतील गुणांच्या आधारे आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत दाखल होईल.

Last Updated : Mar 5, 2020, 11:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details