महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पुण्याच्या लिसा स्थळेकरला 'हॉल ऑफ फेम'चा सन्मान

२००१ ते २०१३ पर्यंत ऑस्ट्रेलियाकडून ८ कसोटी, १२२ एकदिवसीय आणि ५४ टी-२० सामने खेळणार्‍या लिसाने तीनही स्वरूपात मिळून ३९१३धावा केल्या आहेत. मुंबईत वर्ल्डकप जिंकल्यानंतर लिसाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला.

By

Published : Feb 5, 2021, 5:11 PM IST

Updated : Feb 5, 2021, 5:30 PM IST

Lisa Sthalekar
Lisa Sthalekar

सिडनी -ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार लिसा स्थळेकरला ऑस्ट्रेलिाच्या क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) आज शुक्रवारी ही माहिती दिली.

लिसा स्थळेकरला 'हॉल ऑफ फेम'चा सन्मान

हेही वाचा - भारताचा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, ''इंग्लंड भारताला हरवू शकतो''

२००१ ते २०१३पर्यंत ऑस्ट्रेलियाकडून ८ कसोटी, १२२ एकदिवसीय आणि ५४ टी-२० सामने खेळणार्‍या लिसाने तीनही स्वरुपात मिळून ३९१३ धावा केल्या आहेत. मुंबईत वर्ल्डकप जिंकल्यानंतर लिसाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. ''इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध मी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. माझ्या आईचा जन्म तिथला आहे. माझ्यासह माझे वडील भारतीय आहेत. त्यामुळे भारताबद्दल खूप जिव्हाळा आहे. प्रेम आहे. भारतात कारकीर्द संपवण्यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही'', असे लिसाने निवृत्तीच्या वेळी म्हटले होते.

लिसाच्या ऑस्ट्रेलिया संघाने २००५ आणि २०१३ चा एकदिवसीय वर्ल्डकप आणि २०१० आणि २०१२चा टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेमचे अध्यक्ष पीटर किंग म्हणाले, "लिसाला आता माजी दिग्गज बेलिंडाक्लार्क, कॅरेन रॉल्टन आणि मेलानी जोन्स यांच्यासह स्थान मिळाले आहे. हॉल ऑफ फेममध्ये तिचे स्वागत आहे."

'पुणे'प्रेम -

१३ ऑगस्ट १९७९ रोजी पुण्यात जन्मलेल्या लिसाला स्थळेकर कुटुंबीयांनी दत्तक घेतले. त्यानंतर तीनच आठवडयांनी स्थळेकर कुटुंब अमेरिकेला रवाना झाले. सिडनीत कायमस्वरूपी स्थायिक होण्यापूर्वी त्यांनी काही काळ केनियातही वास्तव्य केले. भारतात जन्मल्याने लिसाला भारताची प्रचंड ओढ आहे. लहानपणी पुण्यात आजीकडे महिना-महिना येऊन राहत होती. २०१२मध्ये लिसाने ‘शेकर : रन मेकर, विकेट टेकर’ हे तिचे आत्मचरित्र भारतातच प्रसिद्ध केले. ‘शेकर’ हे तिचे टोपणनाव आहे.

Last Updated : Feb 5, 2021, 5:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details