नवी दिल्ली -१९८७मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अनौपचारिक सामना न खेळल्यानंतर इम्रान खानने क्रीडा साप्ताहिकाच्या लेखात भारतीय आयोजकांवर टीका केली होती. त्यानंतर किशोर भीमानी यांनी पुढच्या अंकात इम्रानला "मला मच्छीबाजारातील वासाची अलर्जी आहे" असे उत्तर दिले होते.
प्रख्यात लेखक आणि समालोचक किशोर भीमानी यांचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले. भीमानी यांचे शहरातील एका नर्सिंग होममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. "माझ्यासाठी ते सर्व काही आहेत. ते माझे गुरू, एक हितचिंतक, मित्र आणि प्रेरणास्थान होते. मला नेहमीच त्यांचे लिखाण आणि दृष्टीकोन आवडायचा. ते खूप सरळ आणि प्रामाणिक होते", असे किशोर भीमानी यांचे मित्र आणि क्रिकेट समालोचक अरुण लाल यांनी त्यांच्या निधनानंतर सांगितले.