महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 25, 2019, 5:14 PM IST

ETV Bharat / sports

संघात पुनरागमन केल्यानंतर पाहा काय म्हणाला क्रिकेटपटू खलील अहमद?

रविवार ३ नोव्हेंबरपासून भारत विरूद्ध बांगलादेश संघामध्ये तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे. टी-२० मालिकेसाठी निवड समितीने कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली असून त्याच्या जागी रोहित शर्माला संघाची कमान देण्यात आली आहे.

संघात पुनरागमन केल्यानंतर पाहा काय म्हणाला क्रिकेटपटू खलील अहमद?

हैदराबाद -आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी अनेक युवा चेहऱ्यांना संघात संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज खलील अहमदही संघात पुन्हा स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत निवड झाल्यानंतर, खलीलची ईटीव्ही भारतने खास मुलाखत घेतली.

खलीलची ईटीव्ही भारतने खास मुलाखत घेतली

हेही वाचा -जेव्हा पंतप्रधान क्रिकेटपटूंसाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात धावतात

या मुलाखतीदरम्यान खलील म्हणाला, 'डावखुरा गोलंदाज असल्याने चांगलं वाटतं. उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजापेक्षा डावखुरा गोलंदाज हा जास्त प्रभावी असतो. संघाला अशा गोलंदाजाची गरज असेल तर माझी संघात निवड होईल.'

'मी माझ्या गोलंदाजीवर काम करत आहे. संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाने मला चांगला सल्ला दिला. माझी अॅक्शन चांगली आहे आणि मला अधिक अनुभव मिळाल्यामुळे मी अधिक शिकण्याचा प्रयत्न करेन', असेही खलीलने म्हटले आहे.

रविवार ३ नोव्हेंबरपासून भारत विरूद्ध बांगलादेश संघामध्ये तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे. टी-२० मालिकेसाठी निवड समितीने कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली असून त्याच्या जागी रोहित शर्माला संघाची कमान देण्यात आली आहे. या संघात वेगवान गोलंदाज म्हणून खलील अहमदची निवड झाली आहे.

टी-२० संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details