महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जय शाह यांची आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती

बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

Jay Shah takes over as Asian Cricket Council President
जय शाह यांची आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती

By

Published : Jan 31, 2021, 9:53 AM IST

मुंबई - बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुणसिंग धुमाळ यांनी ट्विट करत ही माहिती दिली. जय शाह यांनी बांग्लादेशचे नजमुल हुसेन यांची जागा घेतली.

अरुणसिंग धुमाळ यांनी ट्विट करत जय शाह यांचे अभिनंदन केले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जय शाह यांची निवड झाली आहे. मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात एसीसी उत्कृष्ट काम करेल आणि याचा फायदा आशियाई देशातील क्रिकेटला होईल. त्यांना यासाठी शुभेच्छा, असे धुमाळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, धुमाळ यांच्याशिवाय गुजरात क्रिकेट असोसिएशनने देखील ट्विट करत जय शाह यांचे अभिनंदन केले आहे.

एसीसीची स्थापना १९८३ साली करण्यात आली. आशिया खंडात क्रिकेटला प्रोत्साहन देणे, हेच या संघटनेचे प्रमुख लक्ष्य आहे. जय शाह हे भारताचे विद्यमान गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र असून गेले काही वर्ष ते क्रिकेट प्रशासनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. २०१९ सालापासून ते बीसीसीआयच्या सचिव पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

हेही वाचा -मुश्ताक अली टी-२० फायनल : बडोदा-तामिळनाडू जेतेपदासाठी झुंजणार

हेही वाचा -बुमराहने केली कुंबळेच्या गोलंदाजीची नकल, चेंडू वळला झपकन; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details