महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारत-ऑस्ट्रेलिया सामना रद्द करा; जय जवान जय किसान संघटनेचा इशारा

व्हीसीए स्टेडियमची इमारत बेकायदा असून खेळाडू आणि प्रेक्षकांच्या जीवाशी व्हीसीएचे प्रशासन खेळत आहे, त्यामुळे या स्टेडियमवर कोणताही सामना न घेता पोलिसांनीही सामन्यांना परवानगी देऊ नये. वेळ आलीच तर आंदोलन करू अथवा खेळपट्टी खोदून काढू, असा इशारा जय जवान जय किसान संघटनेने दिला आहे.

नागपूर १

By

Published : Feb 23, 2019, 1:14 PM IST

नागपूर- व्हीसीए स्टेडियम हे अनधिकृत असून या स्टेडियमवर ५ मार्चला होणारा सामना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. व्हीसीए स्टेडियमची इमारत बेकायदा असून खेळाडू आणि प्रेक्षकांच्या जीवाशी व्हीसीएचे प्रशासन खेळत आहे. त्यामुळे या स्टेडियमवर कोणताही सामना न घेता पोलिसांनीही सामन्यांना परवानगी देऊ नये. वेळ आलीच तर आंदोलन करू अथवा खेळपट्टी खोदून काढू, असा इशारा जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिला.

महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नागपूर जिल्ह्याच्या ७१९ ग्रामपंचायतीतील २ लाख घरे अनधिकृत असल्याचे घोषित केले आहे. महापालिकेतर्फे ही घरे तोडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईमुळे २ लाख घरमालकांचे आर्थिक नुकसान होऊन १५ लाख नागरिक बेघर होणार आहेत. या प्राधिकरणाचा अहवाल सिंगापूरची कंपनी हॉलक्रोने गुगल नकाशाद्वारे तयार केला आहे. हा अहवाल दोषपूर्ण असून या अहवालात २ लाख घरे अनधिकृत असल्याचे नमूद नाही, असेही जय जवान जय किसान संघटनेचे म्हणणेआहे.

या अहवालामुळे २ लाख घरे, ५० हजार कारखाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच १० लाख भूखंड अनधिकृत झाली आहेत. आधी बेकायदा असलेल्या व्हीसीए स्टेडियमवर कारवाई करा, अन्यथा २ लाख घरे तोडण्याची कारवाई बंद करा, अशी मागणी जय जवान जय किसान संघटनेकडून करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details