महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयपीएल : रोमांचक सामन्यात पंजाबचा राजस्थानवर ४ धावांनी विजय; संजू सॅमसनचे शतक निरर्थक

आयपीएल २०२१ मध्ये आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे.पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबने कर्णधार के.एल. राहुलच्या ९१ धावा व दीपक हुड्डाच्या वादळी ६४ धावांच्या बळावर राजस्थानसमोर २२१ धावांचा डोंगर उभा केला. राजस्थानमध्येही पॉवर हिटर फलंदाज असल्याने हा सामना रंगतदार होणार आहे.

ipl 2021 : Rajasthan Royals vs Punjab Kings match update
LIVE RR vs PBKS : नाणेफेक जिंकून राजस्थानचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

By

Published : Apr 12, 2021, 7:03 PM IST

Updated : Apr 13, 2021, 12:01 AM IST

मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील चौथा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब आणि राजस्थानमध्ये खेळविण्यात आला आहे. या रंगतदार सामन्यात २२१ धावांचा पल्ला गाठताना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएलमधील पहिले झुंजार शतक झळकाविले. मात्र, संघाला विजय मिळवून देण्याचा त्याच्या प्रयत्नावर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पाणी फिरविले. शेवटच्या षटकात संजू सॅमसन बाद झाला.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबने कर्णधार के.एल. राहुलच्या ९१ धावा व दीपक हुड्डाच्या वादळी ६४ धावांच्या बळावर राजस्थानसमोर २२१ धावांचा डोंगर उभा केला. राजस्थानमध्येही पॉवर हिटर फलंदाज असल्याने हा सामना रंगतदार ठरला.

LIVE UPDATE -

  • राजस्थानला मोठा धक्का, बेन स्टोक्स भोपळाही न फोडता माघारी

पंजाब किंग्जची फलंदाजी -

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जकडून केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी सलामी दिली. राजस्थानचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने मयंकला झेलबाद करत आयपीएलमधील आपल्या पहिल्या बळीची नोंद केली. मयंकने 14 धावा केल्या. त्यानंतर आयपीएलचा स्टार खेळाडू ख्रिस गेल मैदानात उतरला. त्याने राहुलच्या साथीने संघाच्या डावाला आकार दिला.

पहिल्या ६ षटकांत पंजाबने 1 बाद 46 धावा केल्या. ख्रिस गेल मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच रियान परागने राजस्थानला मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्याने आक्रमक ख्रिस गेलला बेन स्टोक्स करवी झेल बाद केले. गेलने 28 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 40 धावा केल्या. त्यानंतर 13व्या षटकात कर्णधार लोकेश राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले.

गेलनंतर मैदानात आलेल्या दीपक हुड्डाने आक्रमक फटकेबाजी करत राहुलसोबत 22 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. या भागीदारीनंतर हुड्डाने 20 चेंडूत वादळी अर्धशतक पूर्ण केले. राहुल-हुड्डाने 18व्या षटकात आपली शतकी भागीदारी पूर्ण केली. अवघ्या 45 चेंडूत या दोघांनी शतकी भागीदारी उभारली. त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात मॉरिसच्या गोलंदाजीवर हुड्डा बाद झाला. त्याने 28 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 64 धावांची स्फोटक खेळी केली. 18व्या षटकात पंजाबने द्विशतक फलकावर लागले.

हुड्डानंतर मैदानात आलेल्या निकोलस पुरनला मॉरिसने पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता माघारी पाठवले. साकारियाने त्याचा अप्रतिम झेल टिपला. शाहरुख खानने चार चेंडूत ६ धावांचे योगदान दिले. डावाच्या शेवटच्या षटकात लोकेश राहुल बाद झाला. त्याने ५० चेंडूत ७ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ९१ धावा केल्या. त्याचे शतक ९ धावांनी हुकले.

राजस्थानकडून चेतन सरकारियाने ३, ख्रिस मॉरिसने २ तर रियान परागने एक बळी घेतला.

हेड टू हेड रेकॉर्ड -

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत २१ वेळा समोरासमोर आले आहेत. यात राजस्थान रॉयल्सने १२ सामन्यांमध्ये विजय मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर पंजाब किंग्जला ९ सामन्यात विजय संपादन करता आला आहे.

राजस्थान रॉयल्सचा संघ -

मनन वोहरा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, चेतन सकरिया आणि मुस्तफिजुर रहमान.

पंजाब किंग्जचा संघ -

केएल राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हूडा, शाहरुख खान, झाय रिचर्डसन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, रिले मेरेडिथ आणि अर्शदीप सिंह.

  • नाणेफेकसाठी दोन्ही संघाचे कर्णधार थोड्याच वेळात येणार मैदानात

हेही वाचा -IPL २०२१ : पराभव विसरून चेन्नईच्या खेळाडूंनी बनवली बिर्याणी अन् मारला ताव; पाहा व्हिडिओ

हेही वाचा -IPL २०२१ : रोहितला धावबाद करणाऱ्या लीनचा पत्ता कट; जहीरने केली मोठी घोषणा

Last Updated : Apr 13, 2021, 12:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details