महाराष्ट्र

maharashtra

IPL २०२० रद्द ? बीसीसीआय-फ्रँचायझी बैठक कॅन्सल, संघमालक म्हणाले, IPL नाही झालं तरी ठीक...

बीसीसीआय आणि आठही फ्रँचायझी मालकांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठक होणार होती. पण ती बैठक रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी कोरोनाची परिस्थिती सुधारली तर ठीक अन्यथा आयपीएल रद्द करावे लागले तरी हरकत नसल्याचे म्हटलं आहे. यामुळे आयपीएल होणार की नाही यावर प्रश्न उपस्थित झाला आहे.

By

Published : Mar 24, 2020, 3:05 PM IST

Published : Mar 24, 2020, 3:05 PM IST

ipl 2020 bcci cancels conference call franchise owners kxips ness wadia says if ipl doesnt happen so be it
IPL २०२० रद्द ? बीसीसीआय-फ्रँचायझी बैठक कॅन्सल, संघमालक म्हणतायेत, IPL नाही झालं तरी ठीक...

मुंबई- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेसंदर्भात आज (मंगळवार) बीसीसीआय आणि आठही फ्रँचायझी मालकांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठक होणार होती. पण ती बैठक रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी कोरोनाची परिस्थिती सुधारली तर ठीक अन्यथा आयपीएल रद्द करावे लागले तरी हरकत नसल्याचे म्हटलं आहे. यामुळे आयपीएल होणार की नाही यावर प्रश्न उपस्थित झाला आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया पीटीआयशी बोलताना म्हणाले की, 'मानवता प्रथम आहे, यानंतर सर्व येते. आतापर्यंत परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली नाही. जर सद्य परिस्थिती सुधारली नाही तर त्याबद्दल बोलण्यात काही अर्थच नाही. आयपीएलचे आयोजन नाही झाले तरी चालेल.'

पुढे बोलताना ते म्हणाले, 'सद्या आयपीएलचा विचार करण्याचा अर्थ नाही. संपूर्ण देश लॉकडाउन आहे. आपल्याला या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ही बाब आयपीएलपेक्षा महत्वाची आहे.'

दरम्यान, आयपीएलच्या १३ हंगामाची सुरुवात २९ मार्चापासून होणार होती. पण कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. देशात हा आकडा ४०० पार पोहचला आहे. कोरोनाचा प्रसार पाहता, महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्लीमध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास सर्व रेल्वे गाड्या, बसेस तसेच सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे ३१ मार्चपर्यंत रद्द करण्यात आले आहेत.

हेही वाचा -कोरोनापासून ५ वर्षीय लेकीला वाचवण्यासाठी वॉर्नरची धडपड, पाहा व्हिडिओ

हेही वाचा -'बिना हथियार जंग नहीं जीती जाती,' असे सांगत गंभीरने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दिले ५० लाख

ABOUT THE AUTHOR

...view details